एक्स्प्लोर

Bhandardara Dam: कळसूबाईच्या पायथ्याशी असणाऱ्या भंडारदरा धरणाचं नाव बदललं! शासनाचा आदेश, काय केलंय नामकरण?

अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यास मान्यता दिल्यानंतर आता धरणांचीही नावं बदलू लागल्यानं  आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Bhandardara Dam: राज्यातील सर्वाधिक धरणं असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं समजलं जाणाऱ्या भंडारदरा धरणाचं सरकारनं नाव बदललं आहे. अकोले तालुम्यात असणारं हे फेमस ब्रिटिशकालीन धरण समजले जाणारे भंडारदरा धरणाचे आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नामकरण करण्यात आले आहे. याबाबत सरकारनं नुकताच अद्यादेश जारी केलाय. महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणारे भंडारदरा धरण आणि तिथेच असणारा रंधा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यास मान्यता दिल्यानंतर आता धरणांचीही नावं बदलू लागल्यानं  आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जलसंपदा विभागाच्या अख्त्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्यात आले आहे.

कोण आहेत वीर राघोजी भांगरे?

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा धरणांसह क्रांतीकारकांचा तालुका समजला जातो. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध अकोले तालुक्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे यांनी संघर्षमय लढा उभारला होता. यातच त्यांचे बलिदान दिले होते. त्यामुळे या धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, असे नामकरण देण्यात यावे, अशी आग्रही भूमिका माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली होती. भंडारदरा गाव हे महादेव कोळी आदिवासी समाजबांधवाची अधिक संख्या असणारं गाव आहे. २०२१ पासून या नामकरणासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी भंडारदरा धरणावर आंदोलन उभारण्यात आले होते.

किती वेळा बदललंय भंडारदऱ्याचं नाव? 

भंडारदरा धरण हे पर्यटनासाठी सध्या ओळखले जात असले तरी १९२६ साली ब्रिटिशांनी हे धरण बांधलं होतं. त्या वेळचे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली विल्सन यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करून धरणाला विल्सन डॅम, असे नाव देण्यात आले होते. तेव्हापासून ते आज पर्यंत शासन दरबारी भंडारदरा धरण हे विल्सन डॅम या नावाने संबोधले जाते. तर भंडारदरा धरणाच्या जलाशयाला त्याकाळचे ब्रिटिश इंजिनियर ऑर्थर हिल यांचे नाव देण्यात आले होते.त्यामुळे भंडारदरा धरणाच्या जलाशयाला ऑर्थर लेक असेही संबोधण्यात येत होते. आता या धरणाचं नाव तिसऱ्यांदा बदललं आहे.

हेही वाचा:

Dam Water Storage: पावसाचा वाढता जोर, धरणांच्या पाणीपातळीत वाढ, राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Embed widget