एक्स्प्लोर

जंगलातील गुहेत जात वनकर्मचाऱ्यानं बिबट्याच्या बछड्यांना बाटलीनं पाणी पाजलं; व्हिडिओ व्हायरल, होतंय कौतुक

Ahmednagar akole news : जंगली प्राणी, पशु-पक्षी देखील पाण्याच्या शोधात आहे. अशात एका वनविभागाच्या कर्मचाऱ्याने जंगलातील एका गुहेत जाऊन बिबट्याच्या बछड्यांना पाणी पाजतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Ahmednagar akole news : सध्या महाराष्ट्रात उन्हाचा पाऱ्यानं उच्चांक (Maharashtra Weather Update) गाठला आहे. राज्यातील अनेक तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. माणसांची पाण्यासाठी वणवण होत असताना जंगली प्राण्यांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत.  जंगली प्राणी, पशु-पक्षी देखील पाण्याच्या शोधात आहे. अशात एका वनविभागाच्या कर्मचाऱ्याने जंगलातील एका गुहेत जाऊन बिबट्याच्या बछड्यांना पाणी पाजतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील टाकळी गावच्या जंगलात वन कर्मचारी अशोक घुले त्यांचे सहकारी गेले होते. जंगलात खड्डे खोदण्याचे काम करत असताना त्यांना बिबट्याच्या बछड्यांचा आवाज आला. त्यावेळी ते आणि त्यांचे सहकारी गुहेच्या दिशेने गेले. त्याठिकाणी त्यांना बिबट्याचे 3 बछडे आढळून आले. कर्मचारी अशोक घुले यांची ही माहिती वन क्षेत्रपाल प्रदीप कदम यांना दिल्यानंतर कदम त्यांनी बछड्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या.

कर्मचारी अशोक घुले यांनी 3 महिन्याच्या बछड्यांना एका टोकरीत  पाणी उपलब्ध करुन दिले. यावेळी त्यांनी एका बिबट्याच्या बछड्याला चक्क बाटलीने पाणी पाजले. हे काम करत असताना त्यांच्या एका सहकाऱ्यानं व्हिडिओ शूट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अशोक घुले हे अनेक दिवसांपासून वनविभागात कर्मचारी म्हणून काम करत आहे. विहिरीत पडलेला बिबट्या बाहेर काढणे, मानव वस्तीत घुसलेला बिबट्या सुरक्षित बाहेर काढणे, बिबट्यांविषयी जनजागृती करणे यासह अकोले तालुक्यात बिबट्यांच्या रेस्क्यू टीममध्ये त्यांनी अनेकदा आपल्या कामाची छाप पाडली आहे. 

वन कर्मचारी अशोक घुले यांच्या या धकडाकेबाज तसेच डेअरिंगबाज कामाचे पुन्हा एकदा प्राणी मित्र तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कौतुक केले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget