एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये काँग्रेस नगरसेवकाचा तरुणावर गोळीबार
काँग्रेस नगरसेवकाने एका तरुणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये समोर आला आहे.

अहमदनगर : काँग्रेस नगरसेवकाने एका तरुणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये समोर आला आहे. सुभाष लोंढे असं या नगरसेवकाचं नाव आहे. राजकीय वैमनस्यातून सुभाष लोंढेने राहुल गाढवे या तरुणावर गोळीबार केल्याचं उघड झालं आहे. या गोळीबारत जखमी झालेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अहमदनगर-कल्याण मार्गावर पेट्रोल पंपाच्या परिसरात गोळीबार करुन आठ जणांनी मारहाण केल्याचा आरोप राहुल गाढवेने केला आहे. पोलिसांनी गोळीच्या पुंगळीसह एकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा























