उड्डाणपुलावर उलटला उसाचा ट्रक, पुलाखाली गर्दी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली, 1 जण जखमी
अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील उड्डाणपुलावर उसाचा ट्रक उलटून अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. नेवासा येथून दौंडकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रकचा अपघात झालाय.
Accident News : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील उड्डाणपुलावर उसाचा ट्रक उलटून अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. नेवासा येथून दौंडकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रकचा अपघात झालाय. पुलाखालच्या रस्त्यावर ट्रकचा काही भाग आणि ऊस कोसळल्यानं एक जण जखमी झाला आहे. उड्डाण पुलाच्या दुभाजकाला उसाचा ट्रक धडकल्यानं उसासह ट्रकचा काही भाग पुलावरुन खाली पडला आहे.
पुलाखाली असलेल्या सिग्नलवर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली
सुदैवाने पुलाखाली असलेल्या सिग्नलवर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. याहीपूर्वी याच वळणावरुन ट्रक खाली कोसळला होता. उड्डाणपुलावरील चांदणी चौक परिसरात वळण धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत याच वळणावर पाच ते सहा अपघात झाले आहेत. सध्या उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरुन उसाची वाहतूक केली जाते. या काळात अनेकजा उसाच्या वाहनांचे अपघात झाल्याची घटना घडत अलतात. यापूर्वी देखील अनेक वेळा उसाची वागनं पलटी झाल्याचे पाहायला मिळालं होते. अनेकदा गाडीत उस व्यवस्थित न भरल्यामुळं देखील अपघाताच्या घटना घडत आहे. तसेच ड्रायव्हरच्या चुकीमुळं देखील अशा अपघाताच्या घटना घडत आहेत. अशीच एक ऊसाच्या ट्रकच्या अपघाताची घटना घडली आहे. सुदैवानं आज मोठी दुर्घटना टळली आहे.
दरम्यान, अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहनांचे अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या अपघातांना अनेक गोष्टी जबाबदार आहे. ड्रायव्हरकडून नियमांचे उल्लंघमन करणे, दारु पिऊन वाहन चालवणे या गोष्टींमुळं देखील मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. या अपघातावर नियंत्र मिळवण्यासाठी सर्वांनीच जागरुक राहणं गरजेचं आहे. अन्यथा मोठी हाणी यामध्ये होण्याची शक्यता आहे. क्षणाची घाई देखील पुन्हा महागात पडू शकते. त्यामुळं वाहन चालवताना योग्य ती काळजी घेणं गरजें आहे.