शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी उरले फक्त 3 दिवस
राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये ( Rabi Season) देखील शेतकऱ्यांना (Farmers) एक रुपयात पीक विमा योजना (Pik Vima Yojana) लागू केली आहे.
Agriculture News : राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये ( Rabi Season) देखील शेतकऱ्यांना (Farmers) एक रुपयात पीक विमा योजना (Pik Vima Yojana) लागू केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे.
राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016-17 पासून राबवण्यात येत आहे. खरीप हंगाम 2023 पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम 2024-25 मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2024 आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत 31 मार्च 2025 पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगाम 2023-24 मध्ये विमा योजनेत साधारणता 71 लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते.
पिक विमा योजनेचा उद्देश काय?
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. नाविन्यपूर्ण आणि सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, ज्यामुळे उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास आणि स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होईल, ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याची संधी शेतकऱ्यांना देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या हिश्शाचा प्रिमीय राज्य सरकारनं भरला होता.
खरीप हंगाम 2023 पासून महाराष्ट्र सरकारने एक रुपयात पीक विमा योजना लागू केली
दरम्यान, कृषी विभाग आणि विमा कंपीनीने यातील अनेक बनावट प्रकार समोर आणले आहेत. दरम्यान, खरीप हंगाम 2023 पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रुपयात पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम 2024-25 मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.