Nitin Gadkari: गोवंश सुधारणा प्रकल्प हा क्रांतिकारी प्रयोग, नितीन गडकरींच्या हस्ते बारामतीत गोवंश गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेचं उद्घाटन
Nitin Gadkari : देशी गोवंश सुधारणा प्रकल्प आणि गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळा हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी प्रयोग असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.

Nitin Gadkari : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा (Agricultural Development Trust Baramati) देशी गोवंश सुधारणा प्रकल्प आणि गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळा हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी प्रयोग असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. बारामतीत (Baramati) देशातील पहिल्या देशी गोवंश सुधारणा प्रकल्प आणि गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेचं उद्घाटन गडकरींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
नवीन तंत्रज्ञानाने दुधाचे उत्पादन वाढले तर शेतकरी समृद्ध होईल
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमुळेचं शेतकऱ्यांचे जीवनमान बदलू शकते असे गडकरी म्हणाले. 1952 साली भारतातून गिर जातीची गाय ब्राझीलमध्ये रेतन सुधारणा करण्यासाठी नेली होती. ती गाय तेथे 60 लिटर दूध देवू लागली. त्याचे वीर्य जर दोन लिटर दूध देणाऱ्या गायीस दिले तर ती गाय 20 लिटर दूध देवू शकते. त्यामुळं नवीन तंत्रज्ञानाने दुधाचे उत्पादन वाढले तर शेतकरी समृद्ध आणि संपन्न होईल असेही गडकरी म्हणाले.
प्राण्यांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार व्हावं
प्राण्यांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करून चांगल्या प्रकारचे उपचार मिळणे आवश्यक आहे. या ठिकाणी उत्तम प्रतीचे ब्रिड तयार करण्याचे फार्म तयार करावेत. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे वीर्य उपलब्ध व्हावं असेही गडकरी म्हणाले. बारामतीत झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त रणजित पवार, सकाळ समूहाचे प्रताप पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा निलेश नलावडे उपस्थित होते.
देशी गोवंश प्रकल्पाची उद्दिष्टे
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशु-पोषण, पुनरुत्पादन, पशुरोग निदान, खाद्य तपासणी आणि विस्तार सेवा उपलब्ध करुन देणं. दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढवून पर्यायानं शेतकरी दुग्ध व्यवसायिकांचा नफा वाढवणे हा प्रमुख उद्देश आहे. पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र या प्रकल्पामध्ये देशी गोवंशामध्ये गीर आणि साहिवाल त्यासोबतच म्हैशींमध्ये मुऱ्हा आणि पंढरपुरी या दोन म्हशींच्या जातींचा समावेश केला गेला आहे. या प्रकल्पात सध्या ( IVF) एम्ब्रियो ट्रान्सफर मार्फत ब्राझिलियन आणि भारतीय गीर वासरांची निर्मिती करण्याचे काम चालू केले गेले आहे. या प्रकल्पामध्ये ॲनिमल न्यूट्रिशन,ॲनिमल जेनेटिक्स, डिसीज डायग्नोस्टिक, एम्ब्रियो ट्रान्सफर या विभागाच्या जागतिक दर्जाचे आधुनिक प्रयोगशाळा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Nitin Gadkari : तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी लोक ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील - नितीन गडकरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
