एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलनं; अनेक ठिकाणी रास्ता रोको

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation : मराठा समाजाला (maratha community) आरक्षण मिळावं, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) हे आमरण उपोषणाला बसले आहेत. कालपासून आझाद मैदानावर त्यांच्या उपोषणाल सुरूवात झाली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दिवस आहे. दरम्यान, संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.तसेच राज्यातील विविध ठिकाणांहून समर्थक पाठिंबा दर्शवत आहेत. 

छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरात कडकडीत बंद

मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसापासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करीत असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे याना पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला . यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही . दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नागरीकातून मोठा संताप दिसून आला . आज बंद सुरु असताना छत्रपती शिवाजी चौकात  मराठा संघटनांनी बोंबाबोंब आंदोलन करीत राज्यपाल  कोश्यारी याना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी

 

इंदापूरात लाक्षणिक उपोषण, मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी 
मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा व इतर काही मागण्या घेऊन छत्रपती संभाजी राजे मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यभरातून मराठा समाज हा छत्रपती संभाजीराजे यांना आपला पाठिंबा दर्शवत असताना इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देखील इंदापूर तहसील कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. या लाक्षणिक उपोषणात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले आहे. विविध मराठा समाज बांधव आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतो देत नाही अरे घेतल्याशिवाय राहत नाही अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. आंदोलन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता इंदापूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.


Hingoli - संभाजी राजे यांच्या तब्येतीची सरकारने काळजी घ्यायला हवी अन्यथा..
Hingoli :  मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजे उपोषणाला बसले आहेत आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडली हे त्यांची शुगर आणि रक्तदाब कमी झाला आहे   या उपोषणादरम्यान त्यांच्या तब्येतीला इजा झाली तर याला जबाबदार राज्य सरकार असणार आहे जर सरकार सुरळीत ठेवायचे असेल तर छत्रपती संभाजी राजे यांच्या तब्येतीची सरकारने काळजी घ्यायला हवी अन्यथा जर त्यांच्या तब्येतीमध्ये काही गडबड झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल अशी माहिती मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायकराव भिसे यांनी दिली आहे

संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा

15 फेब्रुवारीला संभाजीरजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राज्यातील विविध संघटनांनी देखील संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांसह नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे. त्यांनी संभाजीराजे यांना पाठिंब्याचे पत्र देत या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.

संभाजीराजे यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण

सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्षा बंगल्यावर सकाळी 11 वाजता चर्चा होणार आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं, असंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आज सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही.  महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले.

22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात

खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.  आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे.  त्यामुळे ज्या 22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले.  याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे. मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलंय, असं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली 11 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. संभाजीराजे म्हणाले की,  यातून मार्ग निघाला पाहिजे.  गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आपण इथे आहोत.   मी मराठ्यांचा सेवक, पण बहुजनांचं नेतृत्व करतो.  आपण मार्ग काढून यावं अशी माझी विनंती आहे, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget