एक्स्प्लोर
Advertisement
मुलाच्या आत्महत्येनंतर आईचीही आत्महत्या
या गावात आशाबाई घोडके आपल्या दोन मुलासह राहत होत्या. यातील नितीन घोडके या मुलाने दुपारी गावातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे आशाबाई यांचा धीर खचला आणि त्यांनीही शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
लातूर : मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील निटूर गाव येथे घडली आहे. अवघ्या काही तासात आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
या गावात आशाबाई घोडके आपल्या दोन मुलासह राहत होत्या. यातील नितीन घोडके या मुलाने दुपारी गावातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे आशाबाई यांचा धीर खचला आणि त्यांनीही शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
मोलमजुरी करून जगणाऱ्या ह्या कुटुंबातील दोघांनी एकाच दिवशी असा मृत्यू झाल्याने निटूर गाव हादरले आहे. नितीनचे लग्न झाले असून त्याला तीन मुले आहेत. यातील दोन मुले अपंग आहेत. आज सकाळी आशाबाईचे कौटुंबिक वाद झाले. राग अनावर झाल्याने मी आता जीव देते असे सांगत त्यांनी घर सोडले. काही वेळाने नितीन घरी आला. त्याला झालेली घटना कळाल्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. शेतात गेलेल्या आशाबाईंना देखील कळाली. त्यांनी धावतपळत गाव गाठले. मात्र घरासमोरील गर्दी पाहून त्या तिथूनच माघारी फिरल्या आणि शेतात जाऊन त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
भारत
Advertisement