एक्स्प्लोर
Advertisement
गोव्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल : संजय राऊत
लवकरच गोव्यातही चमत्कार दिसेल. सरकारला पाठिंबा देणारे आमदारही आमच्यासोबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रानंतर आता शिवसेनेने मिशन गोवा सुरु केल्याचं चित्र आहे. कारण गोव्यात नक्कीच भूकंप होईल असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. माझ्यासोबत गोव्याचे माजी मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई त्यांच्या काही आमदारांसोबत आमच्यासोबत आले आहेत. तसंच सरकारला पाठिंबा देणारे आमदारही आमच्यासोबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. लवकरच गोव्यातचही चमत्कार दिसेल, असं ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "माझ्यासोबत गोव्याचे माजी मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्यासोबत तीन आमदार आहेत. विजय सरदेसाई हे गोवा फॉरवर्डचे प्रमुख आहेत. शिवसेनेसोबत त्यांची आघाडी होणार आहे. गोव्यात नवी आघाडी बनणार आहे."
"गोव्यामध्ये नक्की भूकंप होईल. विजय सरदेसाई त्यांच्या सर्व आमदारांसोबत आहेत. त्यांच्यासोबत चार आमदार आहेत. सरकारला पाठिंबा देणार आमदारही आमच्यासोबत आहेत. सुधीन ढवळीकरांसोबत बोलणं झालं आहे. सरकारसोबत असलेल्या प्रमुख लोकांशी बोलणं झालं आहे. हे सरकार अनैतिक पायावर बनलेलं आहे. लवकर गोव्यात फार मोठी हालचाल पाहायला मिळेल," असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
गोव्यातील शिवसेनेचं अस्तित्त्व आणि तिढा
गोव्यात शिवसेनेचे अस्तित्त्व राजकीयदृष्ट्या नाही. राजकीय सदस्य म्हणून अस्तित्त्व आहे. अस्तित्त्व दाखवण्यासाठी शिवसेना गोव्यात आहेत. विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन आमदार आहेत. मगोकडे एक आमदार आहे. तीन अपक्ष आमदार आणि काँग्रेसकडे पाच आमदार आहेत. काँग्रेस जे आमदार फुटून भाजपसोबत गेले होते, त्यांनी विजय सरदेसाईंवर आरोप केला होता की तुम्ही पुढाकार न घेतल्याने आम्हाला भाजपसोबत जावं लागलं."
गोव्यात निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसकडे 17 आमदार होते. विजय सरदेसाई आणि अपक्षांनी साथ दिली असती, तर गोव्यात काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं असतं. त्यामुळे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये फारसे चांगले संबंध नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विजय सरदेसाई यांचे संबंधही टोकाचे आहेत. त्यामुळे ते कितपत एकत्र येतील यात शंका आहे. परंतु महाराष्ट्रात जे सत्ताबदल झाले आहेत, त्या दृष्टीने काही हालचाली झाल्या तर भविष्यात निवडणुकीत वेगळं चित्र दिसू शकतं.
गोव्यातील पक्षीय बलाबल
भाजप : 27
गोवा फॉरवर्ड पक्ष : 3
मगो : 1
राष्ट्रवादी काँग्रेस : 1
काँग्रेस : 5
अपक्ष : 3
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement