Pune Political News : पुणेकरांच्या प्रश्नासाठी भाजप-कॉंग्रेस एकत्र?
पुण्यात अचानक पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी संप पुकारला. त्यामुळे पीएमपीएमएल विस्कळीत झालेल्या सेवेसंदर्भात भाजप आणि कॉंग्रेसच्या शिष्मंडळाने पीएमपीएमएलचे संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेतली.
Pune Political News : पुण्यात अचानक पीएमपीएमएलच्या (PMPML) ठेकेदारांनी संप पुकारला. त्यामुळे अनेक पुणेकरांचे हाल झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे पीएमपीएमएल विस्कळीत झालेल्या सेवेसंदर्भात भाजप आणि कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने पीएमपीएमएलचे संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेतली.
काँग्रेसचे शिष्टमंडळ रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली पीएमपीएमएलचे संचालक ओम प्रकाश बकोरिया यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचवेळी भाजपचही शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं. याचवेळी त्यांच्या केबिनमध्ये जगदीश मुळीक यांनी हात मिळवत रवींद्र धंगेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी काँग्रेसचे सचिव मोहन जोशी ही उपस्थित होते. त्यामुळे कसबा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पुणेकरांच्या प्रश्नासाठी कॉंग्रेस-भाजप एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालं.
कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपवर आरोप-प्रत्यारोप
मागील काही दिवस पुण्यात पोटनिवडणुकीचे वारे होते. त्यामुळे भाजप- महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे सुरु होते. या निवडणुकीत भाजपला मागे टाकत रविंद्र धंगेकर निवडून आले आणि आमदार झाल्यावर त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. अनेकांच्या समस्या आणि पालिकां प्रशासनाचा भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आज पीएमपीएमएलनेच्या कंत्राटदाराने अचानक संप पुकारल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला आणि शिवाय त्यांना नाहक त्रासही सहन करावा लागला. त्यांचा त्रास कमी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे शिष्ठमंडळ भेटायला गेले होते.
का कंत्राटदारांनी पुकरला संप?
बस पुरवणाऱ्या ठेकेदारांचे तीन महिन्यांपासूनचे बिल थकल्यामुळे चार ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे. आज अचानक पुकारलेल्या संपामुळे शहरात पीएमपीएल बस गाड्यांची संख्या कमी झाली आणि यामुळे नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. पीएमपीएमएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा अचानक संपावर गेल्याने सामन्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा फटका सामान्य पुणेकरांना सहन आहे. पुण्यात अनेक लोक पीएमपीएमने प्रवास करतात. त्यात आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी हे रोज या पीएमपीएमएलने प्रवास करतात. आज अचानक बसची संख्या कमी झाल्यामुळे अनेकांना कामावर पोहचायला उशीर झाल्याचं बघायला मिळालं.पीएमपीएमएलकडे सध्या 2142 बसेस आहेत. यापैकी 1100 बसेस या ठेकेदारांच्या आहेत आणि इतर 900 बसेस या पीएमपी प्रशासनाच्या मालकीच्या आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी शेवटी संप पुकारला आहे. मात्र या सगळ्याचा त्रास सामान्य नागरिकांना भागावा लागत आहे.