एक्स्प्लोर

PSI Exam: खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची जाहिरात निघत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष

Sub Inspector Of Police Exam: याबाबत राज्यातील अनेक आमदार, मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवदेन दिले आहे. 

Sub Inspector Of Police Exam: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली आणि कोरोनामुळे पुढे टप्प्या-टप्प्याने घेण्याचा निर्णय झालेल्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची (PSI Exam) जाहिरात निघत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये पोलीस महासंचालकांनी काढलेल्या एकूण 750 जागांची मुदत 2023 मध्ये संपणार आहे. त्यामुळे सरकराने याबाबत निर्णय घेऊन मुदत संपण्याच्या आत खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची जाहिरात काढण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. तर याबाबत राज्यातील अनेक आमदार, मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवदेन देखील पाठवले आहे. 

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फडणवीस यांना गेल्या महिन्यात पाठवलेल्या निवदेनात म्हटले होते की, "खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परिक्षेबाबतचे एकुण 750 जणांचे मागणीपत्र ऑगस्ट 2021 मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडुन गृहविभागास पाठविण्यात आले. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंजु 750 पदांमधील 250 पदांसाठी एमपीएससी (MPSC) मार्फत व मुख्य परिक्षा घेण्यात आली आहे. तरी ऑगस्ट 750 मंजुर मागणी पत्रकामधील उर्वरित 512 तसेच सन 2021 अखेर रिक्त असणाऱ्या 65 जागा असे एकुण 577 रिक्त जागा असून व सन 2022 व 2023 अखेर रिक्त होणाऱ्या सर्व जागांची एकत्रित मोठी जाहिरात काढून परीक्षा घेण्याची पोलीस अंमलदार यांची अपेक्षा आहे. परंतु गृहविभाग, महाराष्ट्र राज्य येथे चौकशी केली असता आतापर्यंत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडुन गृहविभाग, महाराष्ट्र राज्य यांना कोणतेही मागणी पत्रक अद्यापपर्यंत पाठवण्यात किंवा त्याविषयी बैठक घेण्यात आलेली नाही अशी माहिती समजली आहे.

तरी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडुन गृहविभागास आतापर्यंत जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणी पत्रक तात्काळ पाठविण्यात यावे व गृह विभागाव्दारे पुढील कार्यवाही होण्यास आपणास विनंती आहे. जेणेकरून सर्व पोलीस अंमलदारांना समानतेची संधी उपलब्ध होईल, असे निवदेनात म्हटले आहे. 

वय निघत चालेले...

दरम्यान पोलीस दलातील अनेक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची तयारी करत आहे. त्यातच कोरोना आल्याने फक्त 250 जागांची जाहिरात काढण्यात आली होती. मात्र परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेकांचे वाढते वय पाहता त्यांना या परीक्षेपासून मुकावे लागणार असल्याची भीती वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाहिरात काढून, परीक्षा घेण्याची मागणी पोलीस कर्मचारी करत आहे. त्यामुळे आता गृहमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad: औरंगाबादेत गुन्हेगारांची हिम्मत वाढली! पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप केली व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget