Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा सुरक्षित बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या जागेवर प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पराभवावरून आता संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

Sanjay Raut on Bankipur By-election Result: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Navin) राज्यसभेवर गेल्यानंतर रिकाम्या झालेल्या बिहारमधील (Bihar) बांकीपूर (Bankipur) विधानसभा मतदारसंघात जनसुराज पक्षाचे (Jan Suraaj) संस्थापक प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी 18,953 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा सुरक्षित बालेकिल्ला (Stronghold) समजल्या जाणाऱ्या या जागेवर प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पराभवावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
Sanjay Raut : भाजपचा 30 वर्षांचा गड ढासळला
बांकीपूर हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. नितीन नवीन यांनी 2010, 2015, 2020 आणि 2025 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly elections) येथून सलग विजय मिळवला होता. त्याआधी 1995 पासून त्यांचे वडील नबीन किशोर सिन्हा हे देखील सलग चार वेळा येथून निवडून आले होते. मात्र, या पोटनिवडणुकीत (By-election) प्रशांत किशोर यांनी भाजपचा हा गड खेचून आणत जोरदार राजकीय श्रीगणेशा केला आहे.
Sanjay Raut on Bankipur By-election : रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला
प्रशांत किशोर यांच्या उमेदवारीदरम्यान भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी "बांकीपूरमधून कुत्र्या-मांजराला उमेदवारी दिली तरी ते जिंकून येतील," असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले की, "हे काही आश्चर्य वाटावे असे निकाल नाही. बिहारमधली बांकीपूरची जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांचे वडील हे 1995 पासून ती जागा जिंकत आहेत आणि हा भाजपचा गड असलेली जागा भाजपने प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली. या जागेबाबत भाजपला किती आत्मविश्वास असावा. भाजपचे नेते प्रचाराच्या दरम्यान रविशंकर प्रसाद काय म्हणाले, 'बांकीपूरला कुत्रा आणि मांजर जरी भाजपने उभं केलं तरी लोक मतदान करतील.' हा अहंकार लोकांनी मोडून काढला आहे."
Sanjay Raut : लोकांचा कल बदलतोय : संजय राऊत
मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचा उल्लेख करत राऊत पुढे म्हणाले की, "तसेच मध्य प्रदेशची दतिया विधानसभा ही काँग्रेसचीच होती, ती जिंकण्यासाठी भाजपने साम-दाम-दंड-भेदाचा वापर केला, पण तरीही काँग्रेसने ती जागा जिंकली. हे फार मोठी क्रांती झाली असे मी म्हणणार नाही, पण लोकांचा कल दिसत आहे. मोदी आणि भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे, हे तुमच्या बालेकिल्ल्यातील पराभवातून स्पष्ट दिसत आहे."
"विशेषतः बांकीपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे, तो तुम्ही टिकवू शकला नाही; याचा अर्थ 64 टक्के लोकांनी आपल्या विरोधात मतदान केले आहे. जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते, त्यांनी एक नवीन पर्याय निवडला हे महत्त्वाचे आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी एक अशिक्षित गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस नेमून भारतीय जनता पक्षाने बिहारच्या जनतेचा आणि मतदारांचा अपमान केला आहे," अशी खरमरीत टीकाही राऊत यांनी केली.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?























