एक्स्प्लोर

यंदा वारकऱ्यांविना आषाढी करण्यासाठी प्रशासन सज्ज, शहरातील मठ, धर्मशाळांची तपासणी

आषाढी यात्रेच्या सोहळ्याला येणारे सर्व पालखी सोहळे रद्द करीत प्रशासनाने अगदी मोजक्या वारकऱ्यांसह मानाच्या सात संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यभरातून एकाही वारकऱ्याला या काळात शहरात प्रवेश न देण्यासाठी स्थानिक प्रशासनानेही कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे.

पंढरपूर : राज्यभर पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे यंदा आषाढी यात्रेच्या सोहळ्याला येणारे सर्व पालखी सोहळे रद्द करीत प्रशासनाने अगदी मोजक्या वारकऱ्यांसह मानाच्या सात संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना राज्यभरातून एकही वारकऱ्याला या काळात शहरात प्रवेश न देण्यासाठी स्थानिक प्रशासनानेही कडक पावले उचलायला सुरुवात केली असून शहरातील भाविकांच्या निवासासाठी असणारे सर्व 450 मठ, धर्मशाळा, हॉटेल्स व इतर खाजगी ठिकाणांना नोटीस देऊन तपासणीला सुरुवात केली आहे . याशिवाय आता एकाही नागरिकाला पंढरपुरात प्रवेशासाठी परवानगी न देण्याचे पात्र राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. आषाढी सोहळा हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. दरवर्षी या वरील राज्यभरातून 18 ते 20 लाख भाविक येत असतात. सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने यात्रेला थोडे जरी भाविक आले तर हा प्रसार राज्यभर पसरणारा असल्याने शहरात एकही वारकऱ्याला आता प्रवेश न देण्याची तयारी प्रशासनाने गांभीर्याने सुरु केली आहे. आषाढी वारी! हेलिकॉप्टर किंवा वाहनानं पादुका पंढरीला नेणार, वारकरी आणि अजित पवारांच्या बैठकीत निर्णय आषाढीला येणार भाविक पासेस घेऊन थोडे आधीच पंढरपुरात मुक्कामाला येऊ नये यासाठी शहरातील सर्व मठ व धर्मशाळांना प्रशासनाने नोटीस बजावून एकालाही राहण्यास जागा न देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या या मठात आणि धर्मशाळेत असणारे मठाधिपती व सेवक यांची तपासणी पोलीस पथके जाऊन करीत असून प्रत्येक ठिकाणी नेमके कितीजण राहतात याच्या नोंदी गोळा करीत आहेत. आषाढी वारी! यंदाची पंढरीची वारी पाहा कशाप्रकारे साजरी होणार! वारी पोचवण्यासाठी वारकरी येनकेन प्रकारे पंढरपुरात पोहोचतात याचा अनुभव चार दिवसापूर्वी झालेल्या निर्जळी एकादशीला आला होता. यात नांदेड, लातूर, सांगली, सातारा आणि सोलापुरातून आलेल्या वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाईन करून ठेवले आहे. हे वारकरी इतक्या लांबून दुचाकीवर पंढरपुरात आले होते. आता हा धोका पत्करायचा नसल्याने शहरातील सर्व निवास स्थळांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. याशिवाय सर्व जिल्ह्यातून अधिकृत प्रवेश पासेस बंद केल्यानंतर पोलीस शहराची नाकेबंदी करून कोणालाच शहरात या कालावधीत प्रवेश देणार नाहीत. सध्या विठ्ठल मंदिर 30 जून पर्यंत बंदच राहणार असून 1 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा असणार आहे. वारकरी संप्रदायातील बहुतांश महाराजांनी यंदा आषाढी घरीच करण्याचे आवाहन केले असून कोरोनाच्या फैलावास वारकरी संप्रदायावर ठपका येऊ नये अशी भावना संप्रदायाची आहे. आता यामुळे प्रशासनावरील जबाबदारी वाढली असून आषाढी यात्रा होईपर्यंत कोणालाच शहरात प्रवेश करू न देण्याचे कर्तव्य त्यांना पार पाडावे लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Embed widget