मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप, शेवाळेंच्या आरोपावर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत ( Sushant Singh Rajput ) प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आरोप केल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. "त्या घाणीत मला जायचं नाही. ज्यांची निष्टा ज्यांच्या घरात नसते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? बंडखोरी केलेल्यांना त्यांचेच मित्रपक्ष अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एनआयटी भूखंड प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य प्रश्नानांवरून लक्ष हटवण्यासाठी असे घाणेरडे मुद्दे पुढे केले जात आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केलाय.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय. त्यांच्या या आरोपांवर पलटवार करत आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केलीय.
"महापुरूषांचे अपमान, एनआयटी भूखंड घोटाळा आणि सीमावादासह अनेक प्रश्नांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केले. परंतु, आम्हाला बोलू दिलं जात नाही. राज्यातील खरे प्रश्न बाजूला सारून अशा प्रश्नांवरून बदनामी करण्याचा घाणेरडा प्रयत्न केला जातोय. राज्यातील प्रश्नांनर बोलायला गेलं की माईक बंद केले जातात. राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करत असताना त्यांना पदमुक्त करण्यापेक्षा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यपालांविरोधात आज आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आमच्या विरोधात घोषणा देत आम्हाला बोलू दिलं नाही. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचं लक्षात येतं. एनआयटी घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. कोर्टाने देखील त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळेच या प्रकरणातून त्यांना वाचवण्यासाठी घाणेरडे मुद्दे पुढे करून बदमानी केली जात आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
"मला घाणीत जायचं नाही, ज्यांची घरात निष्ठा राहिली नाहीय त्यांच्यापद्दल काय बोलणार? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. हे सरकार राज्यपालांना वाचवत आहे. राहूल शेवाळेंना काडीमात्र किंमत देत नाही. यांचे लग्न आमच्या घराण्याने कसे वाचवले आहे माहिती नाही का? त्यांच्या वैयक्तिक जीवणार जाणार नाही. त्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. मी यांच्या घाणरड्या राजकारणावर बोलणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप