(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aditya Thackeray : मुख्यमंत्री बदलण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर CM पुत्राचं उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले आदित्य ठाकरे?
"मुख्यमंत्र्याची तब्येत ठिक नसेल तर त्यांनी दुसऱ्या कोणाकडे तरी चार्ज द्यावा. त्यांचा इतर कोणावर विश्वास नसेल तर पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्यावा" अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
Aditya Thackeray on Next CM : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नाहीत. तर आज हिवाळी आधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या उपस्थितीवरून विरोधकांकडून सतत आरोप केले जात आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील यांनी काल मुख्यमंत्री बदलावरून वक्तव्य केले होते. "मुख्यमंत्र्याची तब्येत ठिक नसेल तर त्यांनी दुसऱ्या कोणाकडे तरी चार्ज द्यावा. त्यांचा इतर कोणावर विश्वास नसेल तर पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे चार्ज द्यावा" अशी टीका पाटील यांनी केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या टिकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर देले आहे.
याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव घेण्याचे टाळून "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत एकदम ठिक आहे" असे म्हटले आहे. दरम्यान आधी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, तब्बेत ठिक नसल्यामुळे जर मुख्यमंत्री आपले पद सोडणार असतील तर ते पत्नी रश्मी ठाकरे किंवा पुत्र आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करू शतात.
एबीपी न्यूजसोबत संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, तब्बेत ठिक नसल्यामुळे 45 दिवसांपासून मुख्यमंत्री गायब आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चार्ज इतर कोणाकडे तरी द्यायला पाहिजे."
"आरोग्याच्या कारणावरून राज्यावर अन्याय करू नका. 45 दिवसांपासून राज्यातल्या जनतेनं मुख्यमंत्र्यांना पाहिलं नाही. सामान्य माणसाला सहानुभूती ठीक आहे. परंतु एका नेत्याला चालत नाही आणि यामुळेच तो नेता होतो. सहानुभूतीने राज्य नाही चालवले जात नाही. एक दिवस परदेशात जायचे असेल तरी मुख्यमंत्र्यांना चार्ज द्यावा लागतो. परंतु मुख्यमंत्र्यांचा कोणावर विश्वासच नाही. कोणावर विश्वास नसेल तर तुमच्या विश्वासू आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या. बाबासाहेब पुरंदरे यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करावेत यासाठीची फाईल राज्य सरकारकडे सहीसाठी पाच तास पडून होती. बाबासाहेब पुरंदरेवर ही वेळ येत असेल तर तर इतरांचं काय? त्यामुळं महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही. राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्यायला काही हरकत नाही" अशी कोपरखळी चंद्रकांत पाटील यांनी लगावली होती.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. "चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. ते कसे काय सांगू शकतात की कोणी मुख्यमंत्री व्हावे? असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा
हा सर्व वाद सुरू असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला दिला आहे. रामदास आठवले म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांची तब्बेत ठिक नसेल आणि इतर कोणाला मुख्यमंत्री बनवणार असतील तर भाजप आणि शिवसेनेचा अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या फार्मुल्यावर दोन्ही पक्ष एकत्र येवू शकतात. "
Maharashtra Winter Assembly Session : मुख्यमंत्र्यांनी कुणालातरी चार्ज द्यावा, Chandrakant Patil
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत हवं तर आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या, चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारवर टीका
- Chandrakant Patil vs Girish Bapat : अमित शाह यांच्यासमोरच चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांच्यात शीतयुद्ध
- चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बॅंक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस!