एक्स्प्लोर

'ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचा डाव', दिशा सॅलियन एसआयटीप्रकरणी आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आम्ही राज्यासाठी लढू. देश विकला तसं मुंबई विकू देणार नाही. आरक्षणचा  मुद्दा आहेच मात्र रोजगार हा मोठा मुद्दा आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचं नाही गुजरातच्या हिताचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई :  दिशा सॅलियन (Disha Salian Case)  एसआयटीप्रकरणी (SIT)  आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) सरकारवर हाल्लाबोल केला. ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांना बदनाम करायचं कामं सुरु असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. याशिवाय सरकार यंत्रणेचा गैरवापर करत असल्याची आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. त्याचप्रमाणे सरकार 31 डिसेंबरला पडणार असल्याची भविष्यवाणीही आदित्य ठाकरेंनी केली.

युवासेनेकडून 'स्वेट ऑन स्ट्रीट' या  कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले,  सरकारकडून यंञणेचा गैरवापर होत आहे. घटनाबाह्या सरकार आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या एफडी नक्कीच वाढवले असतील. पण घाबरू नका 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच आहे.  पालिकेला दक्षिण मुंबईच्या रोड संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत मात्र अजूनही उत्तर दिले नाही. 

खोक्यांसाठी अनेक प्रकल्प रखडलेले : आदित्य ठाकरे

मुंबई, महाराष्ट्राची लूट सुरू आहे.मुंबईतले दहिसर ,वरळी आणि इतर असे अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत हे सरकार आणि प्रशासन आम्हाला उत्तर देत नाही दिल्लीला उत्तर देत आहेत. पालिकेला आम्ही प्रश्न विचारते मात्र ते उत्तर देत नाही. हा मुद्दा आम्ही अधिवेशनात घेऊ, पुढील लढाई कोर्टात नेऊ. आमचं सरकार असताना प्रत्येक प्रकल्प संदर्भात प्रत्येक एजन्सीला घेऊन आम्ही बसायचो चर्चा करायचो, प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी करायचो. ऑक्टोबरच्या आसपास वरळी शिवडी कनेक्टर व्हायला हवा होता. मात्र अजून झाला नाही, असे अनेक प्रकल्प आहेत .जे लवकर पूर्ण होणार होते मात्र या सरकारचे लक्ष नाही. खोक्यांसाठी अनेक प्रकल्प लेट केले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. 

सरकार महाराष्ट्राच्या हिताचं नाही गुजरातच्या हिताचे : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले,  ज्यांची त्यांनी भीती वाटते त्यांना असा बदनाम करायचं ते काम करतात. अधिवेशन आल की असं ते वातावरण निर्माण करतात. भीती चांगली आहे. आरोप लावणे त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायची त्यांची सवय आहे. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आम्ही राज्यासाठी लढू. देश विकला तसं मुंबई विकू देणार नाही. आरक्षणचा  मुद्दा आहेच मात्र रोजगार हा मोठा मुद्दा आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचं नाही गुजरातच्या हिताचे आहे.

हे ही वाचा :

Disha Salian Case: बाल्कनीतून पडून मृत्यू, तरीही राजकारण पेटलं, देश गाजवणारं दिशा सालियान मृत्यू प्रकरण नेमकं काय?

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget