एक्स्प्लोर
माझा इम्पॅक्ट : बीड-लातूर मार्गावर गळकी एसटी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन!
एबीपी माझाच्या वृत्ताची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
मुंबई/बीड : बीड-लातूर मार्गावर प्रवाशांना गळकी बस देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दाखवलं होतं. एबीपी माझाच्या वृत्ताची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
रावतेंच्या आदेशानंतर बीड विभागाच्या विभाग नियंत्रकांनी संबंधित बसचं सदोष काम करणाऱ्या शि. सा. लहाने आणि उ. आ. राऊत या बस बांधणी (बॉडीफिटर) कर्मचाऱ्यांना त्वरीत निलंबित केलं. तर त्यांचे वरिष्ठ म्हणून काम करणाऱ्या मो.रा. गोरे आणि म. प. लोढा या अनुक्रमे प्रभारक आणि सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक पदावरील अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा करून सदोष बस मार्गस्थ केल्याचं आरोपपत्र देऊन खातेनिहाय चौकशी सुरु केली आहे.
बीड ते लातूर या प्रवासातील गळक्या एसटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 15 तारखेला ही बस जेव्हा मांजरसुंभ्यात पोहोचत होती, तेव्हा पाऊस सुरु झाला आणि एसटीच्या शॉवर सिस्टिममधून गळती सुरु झाली.
एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जबरदस्तीची आंघोळ झाली. अखेर मांजरसुंभ्यात सगळे प्रवासी उतरले आणि त्यांच्यासाठी दुसऱ्या एसटीची व्यवस्था करण्यात आली.
एसटीची दयनीय अवस्था
19 जुलैपासून राज्यातल्या बहुतांश आगारात नादुरुस्त आणि गळक्या बसची माहिती घेऊन ती माहिती संगणकीकृत करण्याचा विडा महामंडळाने उचलला होता. माहिती संगणकीकृत झाली, पण एसटीची अवस्था मात्र सुधारली नाही. पाऊस कोसळला आणि एसटीने पुन्हा अश्रू ढाळले.
एसटीच्या ताफ्यात सध्याच्या घडीला 15 हजार 550 गाड्या आहेत. त्यातल्या खिळखिळ्या झालेल्या गाड्यांची तर गणतीच नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement