(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विनातिकीट आणि विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, दंडाची रक्कम कोटींच्या घरात
राज्य सरकारच्या निर्देशानुसार विनातिकीट आणि कोरोना नियमांचे पालन न करता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वे कडून प्रचंड दंड आकारला जात आहे.
मुंबई : राज्य सरकारच्या निर्देशानुसार विनातिकीट आणि कोरोना नियमांचे पालन न करता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वे कडून प्रचंड दंड आकारला जात आहे. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एकूण 12.47 लाख प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून दंड म्हणून 71.25 कोटींची रक्कम वसूल करण्यात आली आहे. वसूली केलेल्या दंडाची रक्कम भारतीय रेल्वेच्या इतर सर्व विभागांत सर्वाधिक असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
Mumbai Local : आता 18 वर्षांच्या आतील तरुणांना रेल्वेचा पास मिळणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
ज्या प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, त्यांनी आपल्या प्रवासादरम्यान पूर्णवेळ मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यासोबत सरकारने अंमलबजावणी केलेल्या इतर नियमांचे पालन करणेदेखील बंधनकारक आहे. तरीही जे प्रवासी नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. 7 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या एकूण 25,610 प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यापैकी मास्क न लावणाऱ्या 20,570 प्रवाशांकडून 34.74 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.
Photo : CSMT स्थानकात 'मील ऑन व्हील' रेस्टॉरंट सुरु
राज्य सरकारच्या नियमानुसार सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ज्यांचे लसीकरण होऊन चौदा दिवस पूर्ण झाले आहेत अशा युनिव्हर्सल पास असलेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील अनेक नागरिक लसीकरण पूर्ण झालेले नसतानादेखील प्रवास करताना आढळून येत असतात. असे नागरिक आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोविड -19 मार्गदर्शक तत्तवानुसार प्रवासाला परवानगी नसतानाही प्रवास करणारे 5,040 प्रवासी आढळून आले आहेत. या व्यक्तींकडून 25.20 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
Photo Farmers Rail Roko : बळीराजाचा देशभरात एल्गार; शेतकरी संघटनांचं 'रेल रोको' आंदोलन