एक्स्प्लोर
ध्वजारोहणासाठी जाणाऱ्या दोन एनसीसी कॅडेट्सचा अपघाती मृत्यू
या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने प्रजाकसत्ताक दिनाच्या समारोहाला गालबोट लागले आहे. तर दुसरीकडे हे दोघे एकाच गावातील असल्याने गावात देखील शोककळा पसरली आहे.

लातूर : प्रजाकसत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. अहमदपूर जवळील काजळी हिप्परगा येथे ही घटना घडली. एनसीसी कॅडेट्स असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने प्रजाकसत्ताक दिनाच्या समारोहाला गालबोट लागले आहे.
गोविंद दहिफळे (कवळवाडी ता. अहमदपूर) आणि पूजा भोसले (रा.किनगाव ता. अहमदपूर) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही एकाच रोडवरील गावचे असल्याने दुचाकीवरून महात्मा गांधी महाविद्यालयांकडे येत होते.
ही घटना सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. हा विद्यार्थी अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाकडे येत असताना ही दुर्घटना झाली आहे. गोविंद दहिफळे आणि पूजा भोसले हे दोघेही एकाच रोडवरील गावचे असल्याने दुचाकीवरून महात्मा गांधी महाविद्यालयांकडे येत होते. पूजा ही बीएच्या द्वितीय वर्षात तर गोविंद हा प्रथम वर्षात शिक्षण घेत होते.
या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने प्रजाकसत्ताक दिनाच्या समारोहाला गालबोट लागले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या गावात देखील शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
क्रिकेट























