नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 4 गंभीर
नाशिक महानगरपालिकेत काम करणारे जयंत सांत्रज आणि त्यांचे जावई लग्न कार्यासाठी पुण्याला जात होते. दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपासवर हा अपघात झाला. सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली.
शिर्डी : नाशिक-पुणे महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. स्विफ्ट कारने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले आहेत, तर चारजण गंभीर जखमी आहेत.
नाशिक महानगरपालिकेत काम करणारे जयंत सांत्रज आणि त्यांचे जावई लग्न कार्यासाठी पुण्याला जात होते. दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपासवर हा अपघात झाला. सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली.
संगमनेर शहरात वळण घेत असलेल्या ट्रकला या स्विफ्ट कारची पाठीमागून जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की सांत्रज यांचे जावई भुषण वाळेकर आणि मुलगा आर्यन सांत्रस यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी तात्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला हलवण्यात आले आहे तर दोघांवर संगमनेर येथील तांबे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.