एक्स्प्लोर
बोलेरो पिकअपला अपघात, बँड पथकातील पाच जणांचा मृत्यू, आठ जखमी
बँड पथकाला घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात झाला. ज्यामध्ये पाच जणांचा मृत्य झालाय. बुलडाणा जिल्ह्यातील मेहक-जालना रस्त्यावर ही घटना घडली.

बुलडाणा : एकीकडे गणपती विसर्जनाचा उत्साह असताना दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. बोलेरो आणि लक्झरी बसच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बँड पथकाला घेऊन जाणाऱ्या या बोलेरोला मेहकर-जालना रोडवर अपघात झाला.
मेहकर-जालना रस्त्यावर ब्राम्हण चिकना गावाजवळ ही घटना घडली. या अपघातामध्ये बोलेरो गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत. पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
यवतमाळकडे जाणाऱ्या बसची बोलेरो पिकअपला धडक झाली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भरजहागिर येथील बोलेरो पिकअपमध्ये दहा ते बारा जण बँड पार्टीचे सदस्य होते. कार्यक्रम आटोपून परत जात असताना या बँड पथकावर काळाने घाला घातला.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























