एक्स्प्लोर
लातूर-तुळजापूर रोडवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू
अपघात एवढा भीषण होता, की बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

लातूर : ट्रक आणि बसच्या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. 35 जण या अपघातात जखमी झाले आहेत, त्यापैकी दहा जण गंभीर जखमी आहेत. लातूर-तुळजापूर रोडवर हा अपघात झाला. जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघात एवढा भीषण होता, की बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना केलं.
चालकाच्या बाजूने ट्रकने बसला धडक दिली. त्यामुळे चालकासह यामध्ये प्रवाशांनाही गंभीर इजा झाली आहे.
अपघात एवढा भीषण होता, की बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना केलं.
चालकाच्या बाजूने ट्रकने बसला धडक दिली. त्यामुळे चालकासह यामध्ये प्रवाशांनाही गंभीर इजा झाली आहे. आणखी वाचा