Accident: भीषण! सहलीसाठी गोव्याला गेले, संभाजीनगरला परत येताना मध्यरात्री तीव्र वळणावर बस उलटली, 1 ठार 30 जखमी
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

Kolhapur Accident: कंपनीत काम करणारे कर्मचारी सहल आटोपून गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खाजगी बसला मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. (Goa-Chhatrapati Sambhajinagar Road Accident) कांडगाव जवळील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, 30 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कोल्हापूरमधील सीपीआर (CPR) आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. (Accident)
सहलीहून परतताना भीषण अपघात
छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गोव्याला सहलीचे आयोजन केले होते. ही सहल आटोपून सर्व जण खाजगी बसने छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. मात्र, मध्यरात्री कांडगावजवळच्या वळणावर बसचा तोल गेला आणि ती पलटी झाली. प्रवाशांना सुटका करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांची तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
सर्व प्रवाशी छत्रपती संभाजीनगरचे
मृत आणि जखमी प्रवासी हे सर्व छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, तीव्र वळण आणि वेगामुळे बसचा तोल सुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, चालक झोपेत होता का? बसमध्ये कोणतीही यांत्रिक बिघाड होती का? याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी, ग्रामस्थांनी मोठी मदत करत हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. अपघातग्रस्त बस हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे कामही प्रशासनाकडून सुरू आहे.
अँन्ड्रॉईड फोनवरून फसवणूक
सध्या अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून अनेकांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. यामध्ये अशिक्षितांसोबतच सुशिक्षित सुद्धा फसवले जात असतानाच भिवंडी (Bhiwandi Crime News) शहरातील शांतीनगर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचे (Crime News) कारनामे उघड करण्यात आले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन आरोपी असल्याने तिघा जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून 9 मोबाईल,12 डेबिट कार्ड,17 चेक बुक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. याबाबतची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

