ABP News-C Voter Survey: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर 61 टक्के लोक समाधानी, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी कशी?
एबीपी न्यूज-सी व्होटरने केलेल्या सर्वेत सरासरी 51.94 टक्के लोकांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर सरासरी 61.05 टक्के लोकांना समाधान व्यक्त केला आहे.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून हे सरकार कोरोना सारख्या भयंकर महामारीचा सामना करत आहे. कोरोना महामारी किंवा इतर मुद्द्यांच्या आधारे या महाविकास आघाडी सरकारची कामगिरी कशी आहे, याचा सर्वे एबीपी न्यूज-सी व्होटरने केला आहे. यामध्ये सरासरी 51.94 टक्के लोकांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर सरासरी 61.05 टक्के लोकांना समाधान व्यक्त केला आहे. या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या काही प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी आपली मतं नोंदवली आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का?
खुप समाधानी- 37.14 टक्के
काही प्रमाणात समाधानी- 37.32 टक्के
असमाधानी- 22.52 टक्के
सांगता येत नाही- 3.02 टक्के
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात आहात का?
खुप समाधानी- 46.05 टक्के
काही प्रमाणात समाधानी- 32.69 टक्के
असमाधानी- 17.69 टक्के
सांगता येत नाही- 3.57 टक्के