एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/04/2018
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/04/2018*
- नाणार प्रकल्प गेला, तो होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीमधील जाहीर सभेत निर्धार, उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडून प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याचीही घोषणा https://goo.gl/iWo5nH 'नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही', शिवसेनेच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/2zcSJ6
- राज्यातील 654 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर, मतदान 27 मे, तर मतमोजणी 28 मे रोजी, निवडणूक आयोगाची घोषणा https://goo.gl/ePGDsG
- महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, शरद पवारांचं कोल्हापुरात खुलं आव्हान https://goo.gl/mVRyCv
- मिठाई आणि शीतपेयांसाठी वापरल्या जाणाऱ्या 60 टक्के साखरेवर सेस लावून ऊस उत्पादकांना रक्कम द्या, कोल्हापुरात शरद पवार यांचा सरकारला सल्ला http://abpmajha.abplive.in/
- पाच आमदारांच्या पथकावर हल्ल्याच्या तयारीचा कट उधळला, गडचिरोलीत पोलिसांकडून 16 नक्षलवाद्यांचा खात्मा, गेल्या 38 वर्षातील पोलिसांची सर्वात मोठी कारवाई https://goo.gl/iEVygz
- स्वतःच्या मुलीचं सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, 555 शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्चही उचलला, औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची सामाजिक बांधिलकी https://goo.gl/ahXh6D
- कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या साक्षीदार तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला, नऊ जणांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा, दोघे अटकेत https://goo.gl/sCtAh2
- आई-वडिलांच्या श्राद्धाला लाखो रुपयांच्या पुस्तकांचं वाटप, सांगली जिल्ह्यातील म्हेत्रे कुटुंबाचा उपक्रम https://goo.gl/YQcMcA
- 19 वर्षीय मराठी तरुण जैन धर्माची दीक्षा घेणार, डोंबिवलीतील मंदार म्हात्रेच्या निर्णयाला कुटुंबीयांचा पाठिंबा https://goo.gl/Gacu3q
- लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, संस्थाचालकाने आरोप फेटाळले https://goo.gl/8w7CJ1
- पंतप्रधान मोदी दलितविरोधी, त्यांना संविधान उद्ध्वस्त करु देणार नाही, राहुल गांधींचा घणाघात https://goo.gl/Zg6aDJ
- सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी फेटाळला, विरोधक आक्रमक https://goo.gl/Kv8ceg
- कठुआ बलात्कार प्रकरणात मुलीवर बलात्कार नाही, केवळ हत्या, यात राजकीय षडयंत्र, साध्वी प्रज्ञाचं वादग्रस्त विधान https://goo.gl/fLHXRd
- प्रसिद्ध मॉडेल जेसिका लालच्या मारेकऱ्याला बहीण सबरीनाकडून 19 वर्षांनी माफी, मारेकऱ्याची सुटका केल्यास हरकत नसल्याचंही स्पष्टीकरण https://goo.gl/PJKH1A
- पुण्यातील आयपीएल प्लेऑफ सामने लखनौला हलवण्याची शक्यता, पुण्याच्या मैदानापेक्षा लखनौच्या मैदानाची प्रेक्षकसंख्या जास्त असल्याने चाचपणी करुन निर्णय घेणार, बीसीसीआयच्या सूत्रांची माहिती https://goo.gl/BsKCAZ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement