एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01 मे 2019 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01 मे 2019 | बुधवार*
- गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे 15 जवान शहीद, वाहनचालकाचाही मृत्यू, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडून भ्याड हल्ल्याचा निषेध, गडचिरोलीत सर्वाधिक मतदान झाल्यानेच नक्षलींचा संताप, मुनगंटीवारांचा दावा https://bit.ly/2VFEUfb
- बारामतीत भाजपचा विजय झाला तर लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल, शरद पवारांचं ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर बोट, तर पवारांना पराभवाची चाहूल लागल्याची भाजप नेत्यांची टीका https://bit.ly/2PEq7Ml
- विधानसभेसाठी राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेणं गरजेचं, त्यांना डावलता येणार नाही, शरद पवारांचे एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत भाष्य https://bit.ly/2PC93qc
- बुरखाबंदीच्या अग्रलेखावरुन सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत पुन्हा तोंडघशी, बुरखाबंदी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, नीलम गोऱ्हेंचं स्पष्टीकरण, तर बुरख्याचं समर्थन महिला नेत्यांनी करु नये, राऊतांचं प्रत्युत्तर https://bit.ly/2GMBca9
- महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत पानी फाऊंडेशनकडून राज्यभरात महाश्रमदान, साताऱ्यातील कोरेगावातील श्रमदानात आमीर खानचाही सहभाग https://bit.ly/2VKuQBT
- पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अयोध्येत, भाषणादरम्यान मात्र एकदाही राम मंदिराचा उल्लेख नाही https://abpmajha.abplive.in/
- बडतर्फ बीएसएफ जवान आणि वाराणसीतील समाजवादी पार्टीचे उमेदवार तेज बहादूरचा उमेदवारी अर्ज अवैध, पंतप्रधान मोदींविरोधात बीएसएफ जवानाला उतरवण्याचा सपाचा प्रयत्न फोल https://bit.ly/2GORVty
- ओदिशा किनारपट्टीवर फनी वादळाचं सावट, प्रशासनाकडून अलर्ट जारी, किनारपट्टीवर सुरक्षायंत्रणा तैनात https://bit.ly/2GVqlfu
- अमेरिकेत चार भारतीयांची गोळ्या झाडून हत्या, हत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ट्वीट https://bit.ly/2GH8580
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement