एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 06 ऑक्टोबर 2018 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 06 ऑक्टोबर 2018 | शनिवार
- पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात 12 आणि 20 नोव्हेंबरला, मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये 28 नोव्हेंबरला, राजस्थान आणि तेलंगणात 7 डिसेंबरला मतदान, 11 डिसेंबरला मतमोजणी https://goo.gl/658uS8
- पाच रुपयांच्या दिलाशानंतर पुन्हा इंधन दरवाढ, आज पेट्रोल 18 पैसे तर डिझेल 29 पैशांनी महागलं, डिझेल चार रुपये स्वस्त होऊनही ग्राहकांना फायदा फक्त 70 पैशांचाच https://goo.gl/5qnfrD
- आगामी निवडणुकांसाठी राज्यात राजकीय घडामोडींना वेग, प्रकाश आंबेडकरांसोबतच्या बैठकीत राजू शेट्टींचा महाआघाडीचा नवा प्रस्ताव, मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक https://goo.gl/XQ7YYm
- पार्थच्या उमेदवारीवर शरद पवार अनुकूल नाहीत, अजित पवारांचं सूचक मौन, शरद पवारही निवडणूक लढवणार नाहीत, रायगडमधून भास्कर जाधवांसाठी सुनील तटकरेंची माघार https://goo.gl/zuwghC
- दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाची अपघातग्रस्त बस अंबेनळी घाटातून बाहेर काढली, अपघाताची तांत्रिक कारणं आणि स्टेअरिंगवरील बोटांचे ठसे यांचा पोलीस शोध घेणार https://goo.gl/c2ZxM5
- मंगळवेढ्यात सालगड्याच्या मुलाशी लग्न केल्याच्या रागातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या, मामाच्या तक्रारीनंतर आरोपी वडील आणि सावत्र आईला बेड्या https://goo.gl/6PpZMa
- पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकसत्र सुरु, होर्डिंग कापणाऱ्या दोघांना बेड्या https://goo.gl/ksxcZa
- कौटुंबीक वादातून कोल्हापुर जिल्ह्यात इचलकरंजीजवळील यड्रावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, हल्लेखोर जावयाचा शोध सुरु https://goo.gl/wsW5Wx
- "जे खोटं आहे ते खोटंच आहे," अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण, पत्रकार परिषद घेऊन सगळ्याची उत्तरं देणार https://goo.gl/nEkGvv
- वेस्ट इंडिजला तिसऱ्या दिवशीच गुंडाळलं, राजकोट कसोटीत भारताचा एक डाव आणि 272 धावांनी विजय, पृथ्वी शॉला पहिल्याच कसोटीत सामनावीराचा किताब https://goo.gl/cNqL4f
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement