एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/06/2018*
1. शेतकरी संपाचा आज चौथा दिवस, शहरांची रसद तोडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा https://goo.gl/yiucpA नागपूरमध्ये आंदोलनादरम्यान शेतकरी नेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू https://goo.gl/yiucpA
2. सरकारची नियत नाही, शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घ्या, शरद पवारांचं संपकरी शेतकऱ्यांना आवाहन https://goo.gl/iHgAHH
3. संप करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, त्यांना जामीनही देऊ नका, अभिनेत्री रविना टंडनच्या विधानाने नवा वाद https://goo.gl/zkF7BX
4. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी सदाभाऊंचा कृषी अधिकाऱ्यांना 'सेल्फी विथ फार्मर'चा आदेश, खरीपाची पाहणी करताना सेल्फी घेणार, नव्या आदेशावर टीकेची झोड https://goo.gl/JVPJx4
5. शिवसेना सोबत असो वा नसो, निवडणुकांच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांची कार्यकर्त्यांना सूचना, पालघरमधील विजयानंतर शिवसेनेशिवाय निवडणुका जिंकणं शक्य असल्याचाही दावा https://goo.gl/eqseFX
6. अमृत मलमचे संचालक शैलेश जोशी यांची बेळगावात आत्महत्या, रिव्हॉल्वरने गोळी झाडून आयुष्य संपवलं https://goo.gl/T7Kf2c
7. नोकरीत डावलल्याचा आरोप, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या वाहनांची तोडफोड, राजेंद्र गावितांच्या आश्वासनानंतर स्थानिकांचं आंदोलन मागे https://goo.gl/dw9Soj
8. मुंबईकरांची कामात आघाडी, पगारात पिछाडी, स्वीस बँक यूबीएसच्या सर्व्हेत धक्कादायक माहिती समोर https://goo.gl/qhkwDf
9. विनोद तावडे आणि राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज'वर भेट, दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती, भेटीचं कारण गुलदस्त्यात https://goo.gl/JTH76u
10. हितेंद्र ठाकूरांचा पाठिंबा घेऊ, गद्दारांना धडा शिकवू, जितेंद्र आव्हाडांचं विधान, कोकण पदवीधर निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली https://goo.gl/zXhu1U
11. 'नीट'चा निकाल जाहीर, कल्पना कुमारी देशात पहिली, नांदेडचा कृष्णा अग्रवाल महाराष्ट्रात पहिला तर देशात सातवा https://goo.gl/FGwMaB
12. गावगुंडाकडून महिलेला मुख्य चौकात विवस्त्र करुन मारहाण, चंद्रपूर जिल्ह्यातील येरगावातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल https://goo.gl/cTPcNR
13. एटीएम व्यवहार आणि चेकबुकवर जीएसटी लागणार नाही, अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण, क्रेडिट कार्डच्या विलंब शुल्कावर मात्र जीएसटी लागणार https://goo.gl/ywYVYN
14. मोटोरोलाचा बहुप्रतीक्षित मोटो G6 आणि G6 प्ले लाँच, आज मध्यरात्रीपासून अॅमेझॉनवर विक्री https://goo.gl/GPaaC6
15. शिव्या द्या, पण स्टेडियममध्ये मॅच पाहायला या, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचं भावनिक आवाहन, विराट आणि सचिनचाही पाठिंबा https://goo.gl/hc8X3y
*BLOG* : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग, शिवराज्याभिषेकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी.. (पूर्वार्ध) https://goo.gl/8F3SfK
*माझा विशेष* : शेतकरी आंदोलन : शरद पवार शेतकऱ्यांना भडकवत आहेत का? आज रात्री 9.30 वाजता
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement