एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/01/2018
- राज्याला हादरवणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांडातील 6 दोषींना फाशी, नाशिक सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 2013 च्या प्रकरणाचा निकाल https://goo.gl/my7oN5
- न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर, सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींच्या वादानंतर नवा निर्णय, सोमवारी सुनावणी http://abpmajha.abplive.in
- पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर, बीएसएफच्या कारवाईत पाकच्या चार सैनिकांचा खात्मा, सहा चौक्या उद्ध्वस्त https://goo.gl/5HL8Z5
- एमआयडीसी घोटाळा चौकशीच्या व्याप्तीत वाढ, उद्योगमंत्री सुभाष देसाईंसह अशोक चव्हाण, नारायण राणे आणि राजेंद्र दर्डाही चौकशीच्या फेऱ्यात http://abpmajha.abplive.in
- पार्किंगच्या वादातून पुण्यात अभियंत्याची दगडाने ठेचून हत्या, टूरिस्ट गाड्यांच्या मालकासह तीन जणांना अटक https://goo.gl/FmLfui
- मुंबई-नवी मुंबई जोडणाऱ्या नव्या वाशी खाडी पुलाची उद्यापासून दुरुस्ती, पुढील 20 दिवस वाहतुकीत बदल, हलक्या वाहनांसाठी जुन्या पुलाचा वापर, तर मुंबईबाहेर जाणारी अवजड वाहनं ऐरोलीमार्गे https://goo.gl/uR1BEw
- नाशिकच्या घोटीमध्ये सिझरिंग करताना बाळ दगावल्याने संतप्त नातेवाईकांची रूग्णालयात तोडफोड, चौकशीसाठी 5 डॉक्टर ताब्यात, परिसरात तणाव http://abpmajha.abplive.in
- शनिवार वाड्यावरील खाजगी कार्यक्रमांना स्थगितीचा निर्णय मागे, चौफेर टीका झाल्यानंतर पुणे महापालिकेला उपरती https://goo.gl/xCigbQ
- पिंपरीत टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात तोडफोड, मोफत घरांच्या अफवांमुळे लोकांचा संताप https://goo.gl/SXyQUZ
- नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा पुरस्कार जाहीर, अमोल पालेकर, सत्यशील देशपांडेंसह दिग्गजांचा गौरव https://goo.gl/sLhT7X
- आता विमान प्रवासातही मोबाईलवर बोलणं शक्य, 'ट्राय'कडून वायफायद्वारे इंटरनेट आणि मोबाईल वापरण्यास मंजुरी https://goo.gl/mdVz6E
- गोव्यात टूरिस्ट टॅक्सी चालकांचा संप चिघळला, सलग दुसऱ्या दिवशी पर्यटकांची परवड, सुमारे 20 हजार टूरिस्ट टॅक्सी बंद https://goo.gl/KfgrdX
- ‘पिफ’मध्ये ‘म्होरक्या’ची बाजी, तीन पुरस्कारांवर मोहोर, सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार रमन देवकरला https://goo.gl/pKob1e
- उद्या ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’, मध्य रेल्वेकडून स्पेशल लोकल, कल्याण आणि पनवेलहून पहाटे 3 वाजता लोकल सुटणार https://goo.gl/s4v7kj
- 'पद्मावत'मधील घूमर गाणं नव्याने प्रदर्शित, करणी सेनेच्या विरोधानंतर दीपिकाची कंबर झाकून गाण्याचं नवं व्हर्जन https://goo.gl/Nr3mZd
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement