एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2020 | बुधवार*
- सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा, राज्य सरकारचा मोठा निर्णय पण रोज 45 मिनिटं अधिक काम करावं लागणार, 29 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी https://bit.ly/2Hja2Iw
- मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 31 बंगल्यांसाठी तब्बल 15 कोटी खर्च, विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र https://bit.ly/39uoud0
- मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प रद्द होणार नाही, मंत्री अमित देशमुख यांची माहिती, टप्प्या-टप्प्यानं योजना राबवणार https://bit.ly/2vmFZwZ
- सिंचन घोटाळ्याप्रकरणी दहा आजी-माजी अधिकाऱ्यांवर गुन्हा, सरकारी कर्तव्यात कसूर आणि कंत्राटदारांना नियमबाह्य लाभ पोचवल्याचा आरोप https://bit.ly/2SjyHD6
- दोन अपत्य असतील तरच नोकरी, कर आणि शिक्षणात सवलत द्या, शिवसेना खासदार अनिल देसाईंचं राज्यसभेत खाजगी विधेयक https://bit.ly/2SEIsuD
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची फजिती, देवेंद्र फडणवीस कुठेही जाणार नाहीत म्हणताच खुर्ची तुटली, सोलापुरात पत्रकार परिषदेतील घटना https://bit.ly/37l9uN9
- सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल https://bit.ly/2vnr59U तर नाशकामध्ये अल्पवयीन गतीमंद मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न https://bit.ly/2HfEN17
- विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ, दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, महिला कार्यकर्त्यांचं उद्या देशभरात आंदोलन https://bit.ly/2tQin3o
- बीडमध्ये पहिल्या वृक्ष संमेलनाची सुरुवात, अभिनेते सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईचा उपक्रम, झाडे जगवण्यासाठी मोहीम https://bit.ly/2Snl0mW
- गोव्यात सिनेमा शूट करण्याआधी कथानक सांगा, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा निर्णय, गोव्याची प्रतिमा मलिन होईल अशी कथा असेल तर चित्रीकरणासाठी दारं बंद https://bit.ly/3buJUIF
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement