एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- पुन्हा नवी सुरुवात : पाचव्या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम, मॉल, हॉटेल अन् मंदिरेही बंदच तर, 5 जूनपासून सम-विषम पद्धतीनं दुकानं उघडण्यास परवानगी https://bit.ly/3cpUFvi
- शाळांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण विभागाची बैठक, जूनपासूनच शिक्षण सुरू करण्याची व्यवस्था https://bit.ly/3eDb1lo
- उद्यापासून पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागणार, कोरोनामुळं रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी इंधनावर अधिभार लावण्याचा राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3dlDmwn
- कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका गरीब, श्रमिकांना. त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे; मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांशी संवाद https://bit.ly/2Xix6Qz
- मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून नाशिकचे शेतकरी राजेंद्र जाधव यांचं कौतुक, ट्रॅक्टरवरील सॅनिटायझेशन मशिनचा उल्लेख https://bit.ly/3djknTt
- अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं चक्रीवादळाची शक्यता, मासेमारीसाठी गेलेल्या सर्व 455 मासेमारी बोटींना मत्स्यव्यवसाय विभागाने संदेश पाठवून बोलवले माघारी https://bit.ly/3gDMhvo
- कोल्हापूर, सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड, हिंगोली, बेळगावमध्ये पावसाच्या सरी; 3 ते 4 जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ मान्सून येण्याचा अंदाज https://bit.ly/2yNsubG
- टोळधाडीचं नागपुरात पुन्हा आक्रमण, हजारो एकर शेतीचे नुकसान; गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पाहणी https://bit.ly/2TTgPQ7
- देशात गेल्या 24 तासात सर्वाधिक 8 हजार 380 कोरोना रुग्णांची वाढ, आतापर्यंत 5164 रुग्णांचा मृत्यू, 86,983 कोरोनामुक्त; तर, कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 82 हजार 143 वर https://bit.ly/3gG9yNl
- जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 61 लाखांच्या वर, 27 लाखांहून अधिक रुग्ण झाले बरे तर, 24 तासात 4,454 जणांचा बळी https://bit.ly/2Xikitz
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement