एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2020 | शनिवार
- शस्त्रास्त्रनिर्मितीमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा सध्याच्या ४९ वरुन ७४ टक्क्यांवर, कारख्यान्याचं कंपनीकरण करणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा, कोळसाखाणीचंही खाजगीकरण https://bit.ly/3dTtGJk
- सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजचा पुनर्विचार करावा, शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे नसतील तर लोक काय खाणार? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/3fVAhFa
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला बेस्टमध्ये नोकरी, कुटुंबांना दिलासा; आतापर्यंत सहा बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू https://bit.ly/3bxsZnC
- मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटणजवळ वाहनांच्या रांगा, मुंबई-पुण्यातल्या चाकरमान्यांची गर्दी, कोल्हापुरात आतापर्यंत एक लाख नागरिकांचा प्रवेश, तर मुंबईहून श्रीवर्धनकडे पायी निघालेल्या प्रवाशाचा रस्त्यातच मृत्यू https://bit.ly/2WzKm30
- विलगीकरण सेंटरसाठी वानखेडे स्टेडियमचा तात्पुरता ताबा द्या, महापालिकेची मुंबई क्रिकेट असोसिएशनला विनंती, पुण्यातील बालेवाडीतही रुग्णांसाठी व्यवस्था https://bit.ly/2TrrVM3
- अंबरनाथमध्ये तलवारी घेत रस्त्यावर धुडगूस घातलेल्या आरोपींचे अहवाल पॉझिटिव्ह, चाचणीचे अहवाल येण्यापूर्वीच कोरोनाबाधित आरोपींची पोलिसांनी काढली धिंड https://bit.ly/2LAGoRc
- शेतकरी सन्मानासाठी राजू शेट्टी शेतात उभे, सांगली, नाशिक, येवल्यात शेट्टींच्या आवाहनाला प्रतिसाद, शेतकऱ्यांना अन्नदाता योद्धा संबोधण्याचं आवाहन https://bit.ly/2WARSue
- झोमॅटो कंपनी 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात https://bit.ly/2Z8qKoj
- जगभरातल्या कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत चीनला मागे टाकत भारत अकराव्या स्थानावर, भारतात कोरोनाचे 85 हजार 940 रूग्ण, देशात गेल्या 24 तासात 103 लोकांचा मृत्यू; आतापर्यंत 30 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2zGtK0n
- कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करतेय , अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती https://bit.ly/2WzWG32
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement