(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत https://bit.ly/3hQjSp0 राज्यातील कोणकोणते जिल्हे रेडझोनमध्ये? तुमचा जिल्हा त्यात आहे का? https://bit.ly/3bOBrC6
2. दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर शिक्षण विभाग ठाम; शिक्षण सचिव, अधिकाऱ्यांची महाधिवक्त्यांसोबत चर्चा https://bit.ly/2RJAjbZ
3. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या निवडीवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्यास सुरूवात https://bit.ly/3hPDyZS राज्यपाल नियुक्त सदस्यांची फाईल कोणत्या भुतांनी पळवली?, सामनातून सवाल https://bit.ly/2Tipdv7
4. मराठा आरक्षण प्रश्नावर आढावा घेण्यासाठी खा. संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्राचा दौरा करणार, समाजाची भूमिका आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा मानस https://bit.ly/3oI7ski
5. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबासाठी 4 लाखांच्या भरपाईची मागणी, सुप्रीम कोर्टाने केंद्राकडे उत्तर मागितलं https://bit.ly/3yCAbvl
6. लसींचा अपव्यय टाळण्यासाठी आता ऑन साईट रजिस्ट्रेशनची सुविधा मिळणार; केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/3fEODu9
7. Yellow Fungus: काळ्या, पांढऱ्या बुरशीमागोमाग आता पिवळ्या बुरशीचा धोका; देशात पहिला रुग्ण आढळल्याची चर्चा https://bit.ly/3ugjeUi
8. देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मात्र मृतांचा आकडा वाढला... https://bit.ly/3vg6v5p कोविडमुळे 3 लाखांपेक्षा जास्त मृत्युमुखी; अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात https://bit.ly/3bMwslm
9. Mumbai Corona Cases : मुंबईत काल 1431 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 49 जणांचा मृत्यू https://bit.ly/3hQmzXw राज्यात रविवारी 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/2SqHQws
10. भारतामध्ये 500 बिलियन डॉलर गुंतवणूक करायची इच्छा असल्याचं थेट पंतप्रधानांनाच आवाहन; इंग्रजी वृत्तपत्रातील 'त्या' जाहिरातीमुळे सारा देश बुचकळ्यात https://bit.ly/2RG0gZX
ABP माझा स्पेशल :
- Black Fungus : कोरोना झालेला नाही, तरी काळ्या बुरशीचा धोका आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत https://bit.ly/3ysFkWO
- मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी; कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सचा महाराष्ट्र सरकारला सल्ला https://bit.ly/2RxXw0N
- तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचा आहार कसा असावा? : दीक्षित डाएटचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित https://bit.ly/3yATK7d
- ऐन लॉकडाऊनमध्ये पवई तलावावर प्रेमीयुगुलांची गर्दी, मुंबई पोलिसांनी मग उचललं 'हे' पाऊल! https://bit.ly/3wlMOJs
- टाटानं पुन्हा मनं जिंकली! कोविडमुळं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना TATA STEEL ची मोलाची मदत https://bit.ly/3ufJgXJ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv