ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2024 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2024 | बुधवार
1. मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एलिफंटाला जाणारी प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली, 20 ते 25 जणांचा जीव धोक्यात, बचावकार्य सुरू https://tinyurl.com/5n8dnh7e
2. आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालंय, इतकं नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळाली असती, अमित शाहांचं वक्तव्य, आंबेडकरांचं नाव फॅशन नव्हे तर पॅशन, जितेंद्र आव्हाडांचा पलटवार, आंबेडकर आम्हाला देवापेक्षा कमी नाहीत,देशाच्या संसदेपासून राज्याच्या विधीमंडळापर्यंत विरोधक आक्रमक https://tinyurl.com/mrxwr88t राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, आंबेडकरविरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित शाहांवर भाजप काय कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा सवाल https://tinyurl.com/3jvfehtz आंबेडकरांचा अपमान काँग्रेस लपवू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाहांच्या समर्थनासाठी मैदानात, काँग्रेसनं आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत जुन्या घटनांची उजळणी https://tinyurl.com/423vaz8x
3. मुख्यमंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरेंचा मला मंत्रीपद देण्याचा आग्रह होता, मंत्रिपद न मिळाल्याचं खापर छगन भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांवर फोडलं https://tinyurl.com/3v8euvr6 प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही, पण ओबीसी समाजाचे प्रश्न उपस्थित होतील तेव्हा संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? छगन भुजबळांचा अजितदादांना सवाल https://tinyurl.com/4v52nern सभागृहात नाही पण आम्ही रस्त्यावर लढाई लढू, समता परिषदेच्या मेळाव्यातून भुजबळांचा एल्गार https://tinyurl.com/yck6jnsp
4. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेला अटक, हत्येचा कट रचल्याचा आरोप https://tinyurl.com/mptwhp94 शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार https://tinyurl.com/36sedfkd
5. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा माणूस, त्याच्यावर अनेक गुन्हे, त्याला अटक झालीच पाहिजे, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी https://tinyurl.com/ze4pffvx संतोष देशमुख हत्या आणि वाल्मिक कराडांचा संबंध काय? धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयावर अनेक आमदार-खासदारांचा आरोप https://tinyurl.com/2ma2chv7
6. एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे, तर अजितदादांकडे अर्थखातं कायम, खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/2fmh9znj राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती, अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर https://tinyurl.com/mpd8wbe7 राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य खातेवाटपाची यादी एबीपी माझाच्या हाती https://tinyurl.com/9r7zpdpm
7. मंत्रिपद मिळणार म्हणून कार्यकर्ते गाड्या घेऊन नागपूरला आले होते, त्यांचा अपेक्षाभंग झाला, मला कपॅसिटी असतानाही डावललं गेलं, शिवसेनेचे नाराज आमदार विजय शिवतारेंची आगपाखड https://tinyurl.com/2yzf5bn8 मंत्रिपद न मिळाल्यानं माझी आई आजारी पडली, कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत, शिंदेंचे आमदार प्रकाश सुर्वेंनी खदखद व्यक्त केली https://tinyurl.com/5ee98253
8. परभणी हिंसाचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट, 3 पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश https://tinyurl.com/bdewyu7c सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी https://tinyurl.com/39f7tjpe
9. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, विंदांचे गद्यरुप या पुस्तकाला मान https://tinyurl.com/mweaf6av
10. रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीनंतर घोषणा, तिसरी कसोटी अनिर्णित https://tinyurl.com/3n2nmdtt 14 वर्षे, 765 विकेट्स अन् 4394 धावा, आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी https://tinyurl.com/ymr4u3nf
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























