ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2024 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2024 | रविवार*
1. मनू भाकरने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी, पदक पटकावणारी पहिली महिला नेमबाज https://tinyurl.com/mr2sm7wd कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं, पदक पटकावल्यानंतर मनू भाकरची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ymv6xcex
2. सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, तर हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंकडून 7 राज्यात नियुक्त्या https://tinyurl.com/yzfmcdzn भारतीय जनसंघाचे सदस्य, खासदार ते राज्यपाल, कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन? https://tinyurl.com/2d62mysf
3. पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलिंद नार्वेकर ते प्रज्ञा सातव, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न https://tinyurl.com/22u4dtb6 भावना गवळींकडून शपथविधीवेळी 'जय महाराष्ट्र, जय एकनाथ' असा उल्लेख; तर मिलिंद नार्वेकरांनी बाळासाहेबांना नमन करत मानले ठाकरे परिवाराचे आभार https://tinyurl.com/pp4a7879
4. विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शरद पवारांचं शिष्टमंडळाला मोठं आश्वासन https://tinyurl.com/yc5jdmex शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा समाजाची मातीच केली, शपथविधीनंतर सदाभाऊंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4d496jfh शरद पवारांना सुप्रीम कोर्टाचा निकाल माहित असायला पाहिजे, अमित शहांना तडीपार म्हणणं अयोग्य, भागवत कराड यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2rwz3wtt
5. आमदार चेतन तुपे अजितदादांची साथ सोडणार? शरद पवारांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला लावली हजेरी https://tinyurl.com/2z8w49ch ‘गोल्डन जुलै’ हा कार्यक्रम राजकीय नव्हता, प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित होतो, शरद पवारांसोबत एकाच मंचावर दिसलेल्या चेतन तुपेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4dwerf6v
6. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानाचं पान, नरेंद्र मोदी, अमित शाहांसोबत थेट पहिल्या पंक्तीत स्थान!https://tinyurl.com/4bx3f5fn 83 वर्षांच्या व्यक्तीनं कटपुतल्या सोडल्या, देवेंद्र फडणवीस टार्गेटवर; श्याम मानव आणि मनोज जरांगेंचं नाव घेत अनिल बोंडेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yc2ksc7j
7. मी माझ्या परीक्षेत नापास झाले, हरली पण हार नाही मानली; आता तयारी करून परत मैदानात उतरणार, लोकसभेला पराभूत झाल्यानंतर नवनीत राणांचं पहिलं भाषण https://tinyurl.com/2m3yfd8j चंद्रकांत खैरेची हौस अजून फिटलेली नाही, औरंगाबाद पश्चिममध्ये उमेदवारी मिळवून दाखवा, संदिपान भुमरेंचे ओपन चॅलेंज https://tinyurl.com/4x4ksh7u
8. पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली https://tinyurl.com/4p3tnse3 कृष्णेसह पंचगंगेची पाणीपातळी कमी, मात्र वारणा नदीला पूरस्थिती, अलमट्टी धरणातून सव्वा तीन लाखाने विसर्ग सुरु, सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचे स्थलांतर https://tinyurl.com/n68d2vxc
9. 'सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद व्हायला हवेत, कारण आपण आपल्या देवाचा अपमान करतोय', अभिनेत्री शुभांगी गोखलेंचं स्पष्ट मत https://tinyurl.com/2p8yb4vf
10. चेहऱ्यावर जखमा, स्तन कापलं, गुप्तांगावर वार, मुंबई जवळच्या उरणमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह; यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला अटक करा, संतप्त उरणवासियांची मागणी https://tinyurl.com/4u8hpf5s शहरात कोयता गँगची दहशत; लोहगाव परिसरात दुकानासह वाहनांची मोठी तोडफोड, घटनेचा Video आला समोर https://tinyurl.com/3z5pwe2a
*एबीपी माझा स्पेशल*
कलेक्टर व्हायला दिल्लीत गेली, पण कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरल्याने जीव गमावला; 25 वर्षांच्या श्रेया यादवची 'अधुरी कहाणी'
https://tinyurl.com/3e4fs5kd
माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रातील आठ मुद्द्यांचा नेमका अर्थ काय? 'हे' महत्त्वाचे मुद्दे वाचा मगच करा सही! https://tinyurl.com/yc45vpuu
'दिलीप धोंडीबा'चं केलं 'दिलीप कोंडिबा'! खेडकर कुटुंबाचा नवा कारनामा? बारामतीत जमिनीच्या सातबारावरील नावात दुरुस्ती
https://tinyurl.com/2jbmwek5
*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w