ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2025 | रविवार
1.गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ, धर्माच्या विरोधात जात असेल तर कोर्टालाही मानणार नाही, दादरच्या कबुतरखान्यावरुन जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची आक्रमक भाषा, पर्युषणपर्वानंतरच आंदोलनाची पुढची भूमिका ठरवणार https://tinyurl.com/mt9bhv5y कोंबड्या खाऊन आणि दारू पिऊन किती लोक मरतात हे चित्रा वाघला विचारा, जैन मुनींचा संताप https://tinyurl.com/yw2zsbwn
2. नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं! दादर कबुतरखान्याचा वाद पेटला असताना संदीप देशपांडेंच्या टी-शर्टची चर्चा https://tinyurl.com/bdzesarj ज्यांना कबुतरं आवडतात, त्यांनी ते घरी पाळावेत; मनिषा कायंदेंचा टोला, जैन मुनींनी केलेल्या एकेरी उल्लेखावर नाराजी https://tinyurl.com/2kuhxy2n
3. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांना कुणी गायब केलं का? संजय राऊतांकडून केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा https://tinyurl.com/42cfnh9j 'लापता लेडीज' बद्दल ऐकलं होतं, पण 'लापता' उपराष्ट्रपती पहिल्यांदाच ऐकतोय, अमित शाहांनी स्पष्ट करावे अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाणार, संजय राऊतांचा इशारा https://tinyurl.com/ntb5xuct
4. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे निवडणुकीसंबंधी दावे म्हणजे सलीम-जावेदच्या गोष्टी, देवेंद्र फडणवीसांकडून खिल्ली, तेव्हाच पोलीस आणि निवडणूक आयोगाला का कळवलं नाही? मुख्यमंत्र्यांचा सवाल https://tinyurl.com/8ybasyck
5. 15 ऑगस्टला कल्याण-डोंबिवलीत चिकन, मटनची दुकान बंद ठेवण्याचा पालिकेचा आदेश, तर त्या दिवशी मी मटण पार्टी करेन, जितेंद्र आव्हाडांचे पालिकेला आव्हान https://tinyurl.com/yc6386yy
6. हातपाय घट्ट बांधले, तोंडात बोळे कोंबून निवृत्त शिक्षिकेला संपवलं, मैत्रिणीसोबत फिरायला जाणाऱ्या रत्नागिरीतील जोशी बाईंच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला https://tinyurl.com/3dd6bumt भंडारा हादरले, दोघा तरुणांना भर रस्त्यावर चाकूने सपासप वार करुन संपवलं, जुन्या वादातून हत्या घडल्याचा पोलिसांचा अंदाज https://tinyurl.com/5yehzshc
7. माहेरून 20 लाख घेऊन ये, पुण्यात हुंड्यासाठी आणखी एका लेकीची आत्महत्या, वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न https://tinyurl.com/jt74ydd6
8. मत चोरीच्या आरोपानंतर त्यासंबंधित तक्रार करण्यासाठी काँग्रेसकडून वेबसाईट लाँन्च, मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी, राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु https://tinyurl.com/mw8nz436 कोणत्याही मतदाराचे नाव नोटीस जारी केल्याशिवाय यादीतून वगळले जाणार नाही, बिहारच्या विशेष सखोल पुनरीक्षण मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन https://tinyurl.com/4k8rypxj
9. पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा, 14 ऑगस्टपासून प्रवासाला सुरूवात, सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधलं अंतर अवघ्या 12 तासांवर https://tinyurl.com/5ynhek68
10. प्रो गोविंदा सीझन 3 च्या चषकावर नागपूर निंजास् संघाने उमटवली विजयाची मोहोर, 75 लाख रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मान https://tinyurl.com/4d8pkmtw टीम इंडियाच्या कॅम्पमधून मोठी अपडेट, आशिया कपमध्ये शुभमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता, लवकरच होणार संघाची घोषणा https://tinyurl.com/bdhpfesj
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























