ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2025 | शनिवार*
1.वाल्मिक कराडच सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट, पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून मोठी माहिती समोर https://tinyurl.com/4495w4j7 खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर https://tinyurl.com/2s3mje54 खंडणी ॲट्रॉसिटी अन् संतोष देशमुख हत्येची साखळी एकच, आरोपपत्रातून CID चा मोठा उल्लेख https://tinyurl.com/4zs4s866
2. पाच गोपनीय साक्षीदारांचा जबाब अन् वाल्मिक कराडच्या टोळीचा पर्दाफाश; संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओसुद्धा सीआयडीकडे https://tinyurl.com/5bk39m9t फरार कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडेना, आरोपपत्रात आठव्या नंबरचा आरोपी; चार्जशीटमधून माहिती समोर! https://tinyurl.com/mrnju666 तुम्ही गुन्हे करा, मी तुमच्या पाठीशी आहे असाच वरदहस्त त्यांच्या पाठीशी होता, संघटित गुन्हेगारीतून केलेलं हे कृत्य, यंत्रणांचं अभय होतं, दिवंगत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा आरोप https://tinyurl.com/mr2w6pmc
3. वाल्मिकलाच खंडणी हवी होती.. बाकीची प्यादी, तोच या प्रकरणाचा ब्रेन, कंपनीविरुद्ध जाळ विणलं, अधिकाऱ्यांच्या अंगावर पोरं पाठवली; भाजप आमदार सुरेश धसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/v9vazp8e राजकीय दबाव होता हे चार्जशीटमधून सिद्ध झालं, धनंजय मुंडेंचा सहभाग नव्हता, हे मी मान्यच करत नाही, वाल्मिक कराडला त्यांनीच मोठं केलं; अंजली दमानियांचा हल्लाबोल https://tinyurl.com/bdhptk54 धनंजय मुंडेंचा सहभाग नव्हता, हे मी मान्यच करत नाही, वाल्मिक कराडला त्यांनीच मोठं केलं; सोमवारपर्यंत राजीनामा घेतला नाही, तर आम्ही पेटून उठू, अंजली दमानियांचा इशारा https://tinyurl.com/y3yj58zt
4. संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून पुणे नाहकच बदनाम झाले याचा प्रचंड खेद वाटतो, स्वारगेट अत्याचार प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/2ajmd9ma स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी सुरक्षा केबिन फोडली; आता अजित पवारांचा कारवाईचा इशारा, म्हणाले; काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय, त्यांच्यावर कारवाई केली जाईल https://tinyurl.com/4smnxh5j
5. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा ब्रेक! आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती https://tinyurl.com/286hktu7
6. जवळीक साधण्याचा प्रयत्न नाही, पण भ्रष्टाचार समोर आणत असतील तर फडणवीसांचं स्वागतच! माणिकराव कोकाटे आणि तानाजी सावंत यांच्यावर आरोप होत असतानाच खासदार संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांच कौतुक https://tinyurl.com/45mhd597
7. माझ्या कुटुंबाला काही झालं तर इंद्रजीत सावंत जबाबदार असतील, प्रशांत कोरटकरच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांची पोलिसांत तक्रार https://tinyurl.com/5xbajswk परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण, प्रशांत कोरटकरच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5xbajswk
8. रेल्वे क्रॉसिंग सिग्नल तपासणीसाठी गेलेल्या केके एक्स्प्रेसची धडक; सोलापुरातील अपघातात पोलीस शिपायाला जागीच मृत्यू https://tinyurl.com/4tbeyzbz
बारावी 'नीट' परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/mryctezj
9. द्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 50 कामगारांचा बचाव, 4 जणांचा मृत्यू, अजूनही 5 जणांचा शोध सुरुच https://tinyurl.com/4py699wp
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली! https://tinyurl.com/yj829v87
10. चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप! जोस बटलरचा कर्णधारपदाचा राजीनामा https://tinyurl.com/yc5x7czk
*एबीपी माझा स्पेशल*
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे 1500 रुपये खात्यात आले का? बहुसंख्य महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा https://tinyurl.com/3tu4kup4
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























