स्मार्ट बुलेटिन | 5 जानेवारी 2021 | मंगळवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
![स्मार्ट बुलेटिन | 5 जानेवारी 2021 | मंगळवार | ABP Majha ABP Majha Smart Bulletin for 5th January 2021 latest updates स्मार्ट बुलेटिन | 5 जानेवारी 2021 | मंगळवार | ABP Majha](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/05135305/SMART_BULLETIN_0501.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. भारत बायोटेकचे कृष्णा इला आणि सीरमच्या अदर पुनावाला यांच्यात वाकयुद्ध, कोवॅक्सिनची पाण्याशी तुलना करणाऱ्या अदर पुनावालांवर कृष्णा इला यांचा हल्लाबोल
2. ब्रिटनमधील नव्या कोरोना स्ट्रेनचा महाराष्ट्रात शिरकाव; मुंबईतील पाच जणांसह एकूण 8 जणांना लागण
3. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनवर पुन्हा लॉकडाऊनची नामुश्की, कोरोनाचा संसर्ग अतिशय झपाट्यानं होत असल्यामुळे निर्णय
4. महाराष्ट्रातील किसना आर्मीची पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री आणि कृषी मंत्री यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
5. शेतकरी आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारसोबतची कालची बैठक निष्फळ, आज सिंघु बॉर्डवर दुपारी दोन वाजता शेतकरी नेत्यांची बैठक
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 जानेवारी 2021 | मंगळवार | ABP Majha
6. केंद्राने राज्यावर कृषी कायदा लादलाय, पण सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांची ग्वाही
7. हिमाचल, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळमध्ये बर्ड फ्लूचं थैमान; बिहार, उत्तराखंडात अलर्ट, महाराष्ट्रात सध्या कोणताही धोका नाही
8. दुबईहून परतल्यानंतर संस्थात्मक क्वॉरंटाईनचे नियम न पाळणाऱ्या अभिनेते सोहेल, अरबाज आणि निर्वाण खानविरोधात गुन्हा दाखल
9. मुंबईतील जम्बो कोविड सेंटर होणार जम्बो लसीकरण केंद्रे, कोरोना संकटात उभारलेली जम्बो कोविड सेंटर आता लसीकरणासाठी वापरणार
10. तरुणीवर गोळी झाडत तरुणाची आत्महत्या, मुंबईतील मालाडमधील धक्कादायक घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)