एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 27 जुलै 2020 | सोमवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. स्वदेशी कोवॅक्सिन लशीच्या पहिल्या टप्याचा पहिला भाग पूर्ण, मानवी चाचणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक, हरियाणातील रोहतकमध्ये चाचणी 2. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आजपासून तीन दिवस अंतिम सुनावणी, तर विद्यापीठ अंतिम परीक्षांबाबत आदित्य ठाकरे यांच्या याचिकेवर आज सुनावणी 3. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा आज पहिला वाढदिवस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मिलिंद नार्वेकरांकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा 4. मुंबई परिसरातील दादर, परळ आणि कुलाबा भागांत मुसळधार पाऊस, हिंदमाता परिसरात साचलं पाणी; ठाणे, नवी मुंबई परिसरातही जोरदार पाऊस 5. आज पहिला श्रावणी सोमवार, राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये विधिवत पूजा, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकांना मंदिरात जाता येणार नाही पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 जुलै 2020 | सोमवार | ABP Majha 6. महाराष्ट्रात काल 9 हजार 431 जणांना कोरोनाची लागण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पावणेचार लाखांच्या घरात, तर 24 तासांत 267 रुग्णांचा मृत्यू 7. कोल्हापूर, सातारा आणि सोलापुरात आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता, अत्यावश्यक सेवांची दुकानं सुरु होणार, मात्र सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना बंदी कायम 8. अनलॉक 3 च्या टप्प्यात अटी-शर्तींसह थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स सुरु होण्याची शक्यता, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय गृहमंत्रालयाला प्रस्ताव 9. ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण, उदगीरचे मतदासंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे कोरोना पॉझिटिव्ह 10. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महेश भट्ट यांची चौकशी होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती, गरज पडल्यास करण जोहरचाही जबाब नोंदवणारअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement