एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 24 फेब्रुवारी 2019 | रविवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
- नरेंद्र मोदींच्या हस्ते 'पंतप्रधान किसान सन्मान निधी'चं आज उद्घाटन, एक कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार
- अर्थमंत्री अरुण जेटलींच्या नेतृत्त्वाज जीएसटी काऊन्सिलची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, निर्माणाधीन आणि स्वस्त घरांवरील जीएसटीबाबत चर्चा होणार
- मसूद अजहर मौलाना नसून सैतान, पुलवामा हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींचा पाकिस्तानवर घणाघात, मुंबईत वंचित बहुजन आघाडीची विराट सभा
- राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणं म्हणजे चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला, परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप
- गुलाम म्हणून शिवसेना-भाजपसोबत राहणार नाही, युतीत रिपाइंला एकही जागा न मिळाल्याने रामदास आठवले नाराज, राजकारणात सर्व मार्ग खुले असल्याचेही संकेत
- औरंगाबादच्या आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरेंची अंधश्रद्धा, जप करुन रुग्णांना बरं करतो, मात्र प्रमोद महाजनांच्याबाबतीत मी फेल झालो, चंद्रकात खैरेंचा अजब दावा
- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात, 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार, तर पर्रिकरांची प्रकृती स्थिर असल्याची गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती
- अपघातानंतर मृतदेह 22 किलोमीटर फरफटत नेला, लातूरमधील धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर, गाडी ताब्यात मात्र चालक फरार
- एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याच्या धमकीनंतर मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवली, पोलिसांकडून कसून चौकशी, एक संशयित ताब्यात
- भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान आज विशाखापट्टणममध्ये पहिला टी-20 सामना, पाच वन डे आणि दोन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement