स्मार्ट बुलेटिन | 22 मे 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
नॉन रेड झोनमध्ये आजपासून एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु, नियम आणि अटींचं पालन करत लालपरी धावणार आजपासून मर्यादित स्वरूपात स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काउंटर्स ओपन होणार, सध्या सुरु असलेल्या गाड्यांचंच आरक्षण मिळणार राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 42 हजारांच्या जवळपास, काल एका दिवसात 1408 रुग्णांना डिस्चार्ज पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, कोरोनाबाधित रुग्ण थेरपीमुळे कोरोनामुक्त झाल्याचा दावा मुंबईतील नदी-नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करणार; पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश
माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी विश्वस्तांकडून शासनाला तीन प्रस्ताव, वारीबाबत आराखडाही सादर सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांची आज बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल, ओडिशाचा हवाई दौरा करणार, अम्फान चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या जवळ, 20.78 लाखांहून अधिक बरे झाले भारताच्या क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव; माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ याचा आरोप