एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 22 फेब्रुवारी 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
1. मुंबईची लाईफलाईनवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश, रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेत मोठी वाढ
2. मुंबईच्या दिशेने येणारं लाल वादळ थांबवण्यात सरकारला यश, किसान मोर्चावर सकारात्मक तोडगा, वन हक्क जमिनीचे दावे तीन महिन्यात निकाली काढणार
3. धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यासोबतची बैठक निष्फळ, सरकारनं तोंडाला पानं पुसल्याचा नेत्यांचा आरोप, धनगर आंदोलन सुरु होण्याची शक्यता
4. आम्ही भाजपचा सन्मान करतो, त्यांनीही आमचा सन्मान करावा, आम्ही कुणाला जिंकवू शकत नाही मात्र कुणालाही पाडू शकतो, रामदास आठवलेंचा भाजपला इशारा
5. मुंबई महापालिकेत पहारेकऱ्यांची भूमिका बजावणाऱ्या भाजपला सत्तेत सामील होण्याचे वेध, शिवसेना-भाजप युतीनंतर पालिकेतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता
6. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफच्या व्याजदरात वाढ, व्याजदर 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्के करण्याचा निर्णय
7. बलात्कार हा हत्येपेक्षा मोठा गुन्हा नाही, फाशीची शिक्षा अयोग्य, शक्ती मिल गँगरेपप्रकरणी आरोपींच्या वकिलांची याचिका
8. पाकिस्तानला वाहून जाणारं भारताच्या वाट्याचं पाणी रोखण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, हे पाणी पूर्ववाहिनी नद्यांना जोडून जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या रहिवाशांना दिलं जाणार
9. भारताकडून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध, तर पाकिस्तानकडून हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' संघटनेवर बंदी
10. बीसीसीआयने आयसीसीकडे पाकिस्तानला क्रिकेट विश्वचषकातून वगळण्याचा प्रस्ताव मांडला नाही, पीटीआयची माहिती, तर माजी कर्णधार सौरव गांगुलीकडूनही पाकसोबतचे खेळांचे सर्व करार तोडण्याचं आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement