एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 16 नोव्हेंबर 2019 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. सत्तास्थापनेसाठी कुणाच्याही संपर्कात नाही, मात्र भाजपशिवाय सरकार अशक्य, चंद्रकांत पाटलांचा दावा, तर 17 नोव्हेंबरपर्यंत सत्तास्थापना शक्य नाही, शरद पवारांकडून स्पष्ट
2. सरकार आणणं किंवा कुणाला मुख्यमंत्री करणं हे उदिष्ट नाही, पुण्यातील कार्यक्रमात नितीन गडकरींचं वक्तव्य, विचारांच्या कार्यकर्त्यांना जपण्याचंही आवाहन
3. शेतकरीप्रश्नी महाशिवआघाडीचे नेते आज राज्यपालांना भेटणार, नवाब मलिकांची माहिती तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाबत देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपालांची भेट
4. भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस, पराभूत उमेदवारांसोबत चिंतन, संघटनात्मक बदलांचीही शक्यता, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांची उपस्थिती
5. सत्तापालट झाल्यास राज्यातील मेट्रो-3, समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांचं काय होणार? प्रशासकीय वर्तुळात चर्चा, प्रकल्प अधिकाऱ्यांचं भवितव्यही टांगणीला
6. बळीराजाच्या मुलीचा हट्ट उद्धव ठाकरेंनी पुरवला, मुलीच्या घरी भेट, सातारा जिल्ह्यातल्या दौऱ्यादरम्यानची घटना, कांचनच्या कुटुंबाला आनंदाश्रू
7. रायगडमध्ये माणगाव इथल्या एमआयडीसीमधील कंपनीत स्फोट; दोघांचा मृत्यू, 16 जण गंभीर, मदत मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची गावकऱ्यांची भूमिका
8. केंद्र सरकार कांदा आयात करणार, दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्णय, उन्हाळी कांदा बाजारात येण्यास अवकाश असल्याने आगामी काळात दर चढेच राहणार
9. सरकार बँकांमधील एक लाख रुपयांच्या सुरक्षा हमीवरील मर्यादेत वाढ करणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य, येत्या अधिवेशनात विधेयक आणणार
10.मयांक अगरवालच्या द्विशतकामुळे इंदूर कसोटीत टीम इंडियाचा धावांचा डोंगर; दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या सहा बाद 493 धावा, टीम इंडियाकडे 343 धावांची भक्कम आघाडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement