स्मार्ट बुलेटिन | 15 फेब्रुवारी 2021 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
![स्मार्ट बुलेटिन | 15 फेब्रुवारी 2021 | सोमवार | एबीपी माझा ABP Majha Smart Bulletin for 15th February 2021 latest updates Maharashtra news स्मार्ट बुलेटिन | 15 फेब्रुवारी 2021 | सोमवार | एबीपी माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/15131924/SMART_BULLETIN_1502.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
1. पूजानं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, वडील लहू चव्हाणांची माझाला मुलाखत, तर पूजा भोवळ येऊन बाल्कनीतून पडल्याचा जबाब मिळाल्याची पोलिसांची माहिती
2. मुंबई आणि आसपासचा शहरी भाग वगळता राज्यभरातली कॉलेज आजपासून सुरु, रोटेशन पद्धतीनं 50 टक्के विद्यार्थी हजर राहणार
3. वाहनांना फास्टॅग लावण्याच्या मुदतीचा आज अखेरचा दिवस, यापुढे मुदतवाढ मिळणार नसल्याचं नितीन गडकरींकडून स्पष्ट
4. सर्वसामान्यांना महागाईचा झटका, गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ
5. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन अलर्ट, विदर्भातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं आकेडवारीतून स्पष्ट
6. राजगडच्या बुरुजावर अडकलेला मोबाईल चार्जर मिळवण्याच्या नादात मुंबईकरानं जीव गमावला, दरीत कोसळून मृत्यू, तर लवासा प्रकल्पातील धरणात दोघांचा बुडून मृत्यू
7. केंद्र सरकारचे कर्मचारी कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहतील; कार्मिक मंत्रालयाचे निर्देश
8. राज्यात उद्यापासून पावसाचा अंदाज, हवामानातील बदलाचा परिणाम
9. राज्यभर माघी गणेशोत्सवाचा उत्साह, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रसिद्ध गणपती मंदिरात भक्तांची रिघ
10. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, इंगलंडचा पहिला डाव 134 धावांत आटोपल्यानंतर भारताला 249 धावांची आघाडी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)