एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 11 ऑगस्ट 2019 | रविवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
- पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या हाती काँग्रेसची कमान, हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यकारिणीच्या बैठकीत निवड
- सांगली, कोल्हापुरातली पाणीपातळी घटली, पंचगंगेची पाणीपातळी 51 फुटांवर तर कृष्णेची पातळी 6 फुटांवर, प्रमुख रस्त्यांवरील पाणी ओसरण्यास सुरुवात
- आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं, राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाची माहिती
- राज्याच्या कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, कलाकार मंडळीही पुढे सरसावली, शिर्डी, सिद्धिविनायक संस्थानाचीही मोठी मदत
- महापुरामुळे प्रवासी वाहतुकीला मोठा फटका, एसटी महामंडळाचं दहा दिवसांत 100 कोटींचं नुकसान तर मुंबई-पुणे रेल्वेसेवा 16 ऑगस्टपर्यंत बंद
- पूर संकटामुळे विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी घ्या, राज ठाकरेंची मागणी, जागांचा अंदाज येतो मग पाण्याचा का नाही, भाजपवर खोचक टीका
- ईदला भारतात मोठा घातपात करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा, मुंबई, दिल्लीसह महत्त्वाच्या शहरांमध्ये गुप्तचर यंत्रणांचा हायअलर्ट
- मुंबई एटीएसकडून बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटरचा पर्दाफाश, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय
- भारताशी व्यापार बंद करणं पाकिस्तानच्या अंगलट, फळ, भाजीपाला, सोनं, इंधन दरात प्रचंड वाढ, अर्थव्यवस्था ढासळल्यानं इम्रान खान सरकार अडचणीत
- विविध तांत्रिक कामांसाठी आज मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement