स्मार्ट बुलेटिन | 10 मार्च 2021 | बुधवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, API सचिन वाझेंची महाराष्ट्र एटीएसकडून पुन्हा होऊ शकते चौकशी
सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालतंय, वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी, देवेंद्र फडणवीसांची मागणी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह असल्याचा अहवाल देणाऱ्या मुंबईतील टेक्निशियनला बेड्या
राज्यांना जीएसटी भरपाईचा 19 वा हप्ता केंद्र सरकारकडून जारी; 7 राज्यांना 2,103.95 कोटी रुपये
राज्यात काल 9927 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 12182 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज
केवळ सरकारी नोंदणीकृत डॉक्टरच 50 लाखांच्या पंतप्रधान विमा योजनेस पात्र, हायकोर्टाचा निकाल
भूमाफियांकडून कोरोना काळात केलेल्या 9 हजारहून अधिक अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेची कारवाई
जीएसटीचे 12 कोटी बुडवले, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकाविरोधात गुन्हा दाखल
जेजुरीत 10 ते 12 मार्चपर्यंत जमावबंदी; महाशिवरात्रीला खंडोबा मंदिरात दर्शनास मनाई
वाशिममधील सख्ख्या बहिणींच्या जिद्दीची कथा, तिघी झाल्या पोलीस दलात भरती























