एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 06 एप्रिल 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 750च्या घरात, तर आतापर्यंत 45 जणांचा बळी, एकट्या मुंबईत साडेचारशे कोरोना बाधित
2. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभर प्रतिसाद, नेते, अभिनेत्यांसह दिग्गज उद्योजकांकडून दीपप्रज्वलन
3. दिव्यांच्या नावाखाली काही ठिकाणी येड्यांची जत्रा आणि खुळ्यांचा बाजार, हातात चक्क मशाली घेऊन रॅली, तर सोलापुरात आगीची घटना
4. तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, सरकारची माहिती, 21 राज्यांतील जवळपास अकराशे रुग्णांना फटका
5. लॉकडाऊनंतरही जिल्ह्याच्या सीमा बंदच ठेवण्याचा सरकारचा विचार, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि सचिवांमध्ये चर्चा
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 एप्रिल 2020 | सोमवार | ABP Majha
6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची माजी राष्ट्रपतींसोबत चर्चा, सोनिया गांधींसह, ममता बॅनर्जींसोबतच अनेक विरोधी पक्षांसोबतही खलबतं
7. लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने विमानसेवा सुरु होणार, देशांतर्गसह आंतरराष्ट्रीय उड्डाणंही सुरू होण्याची शक्यता
8. अरबी समुद्रातील 1700 खलाशी बंदरावरच अडकले, क्वारंटाईन करण्यास गुजरात सरकारचा नकार, तर सीमाबंदीमुळे महाराष्ट्रात येणंही अशक्य
9. रुग्णसेवेसाठी त्यांचा दररोज नऊ तास प्रवास, पहाटेच घर सोडावं लागतं, मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कर्तव्य निष्ठा
10. जगभरात कोरोनाचे 13 लाख रुग्ण, आतापर्यंत 70 हजारांहून अधिक लोकांचा बळी, एकट्या अमेरिकेत 24 तासांत अकराशे बळी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement