(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 02 जून 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. मुंबईसह कोकणात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकणार, एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
2. यंदा देशात सरासरीच्या 102 टक्के पावसाचा अंदाज, देवभूमी केरळात पावसाच्या सरी, मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण
3. पीककर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत 50 ते 53 टक्क्यांची वाढ, केंद्राच्या निर्णयामुळे मध्यम उद्योगांना दिलासा
4. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला, आतापर्यंत 30 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
5. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश, कोरोना संकटाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा जाहीर
6. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या निकालात एटीकेटी आणि ऐच्छिक परीक्षेबाबत विद्यार्थी अजूनही संभ्रमात, सरासरी गुण देऊन पदवी मिळणार की एटीकेटीच्या परीक्षा पुन्हा घेणार, विद्यार्थ्यांसमोर प्रश्न
7. लॉकडाऊन काळात पेईंग गेस्टकडे घरभाड्यासाठी तगादा, एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीच्या तक्रारीनंतर पुण्यात घरमालकिणीवर गुन्हा दाखल
8. मुजफ्फरपूर रेल्वे स्टेशनवर मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या मुलाच्या मदतीसाठी शाहरुख खान सरसावला, मीर फाऊंडेशन मुलाला अर्थसहाय्य करणार
9. 70 लाख भीम अॅप युझर्सचा डेटा ऑनलाईन लीक, इस्रायली सायबर सिक्युरीटी फर्मचा दावा, तर युझर्सच्या डेटा सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं सांगत केंद्र सरकारने दावा फेटाळला
10. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने निळ्या रंगाचा लोगो आणि कव्हर पेज काढून काळ्या रंगाचा केला, बायोमध्ये #BlackLivesMatter लिहून अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूचा निषेध
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जून 2020 | मंगळवार | ABP Majha