एक्स्प्लोर

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 29 ऑक्टोबर 2021 : शुक्रवार : ABP Majha

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आर्यन खानची आज तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता, मन्नतबाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा जल्लोष

मुंबई क्रूझ ड्रग्ज (Mumbai Drug Case) प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानची अखेर 25 दिवसांनी जामीनावर सुटका झाली. परंतु, निकालाची प्रत आज मिळणार असल्यानं आर्यनला जामीन मिळाल्यानंतरही आणखी एक रात्र तुरुंगातच काढावी लागली. आर्यन खान आज तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात काल (गुरुवारी) पार पडलेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू माजी अटॉर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी मांडली. तर एनसीबीच्या वतीनंही जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अखेर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन मंजूर करण्यात आला. 
 
2. क्रूझ पार्टी आयोजक काशिफ खान यांच्यावर समीर वानखेडेंनी कारवाई करू दिली नाही, मलिक यांचा आरोप, वानखेडेंवर तूर्त कठोर कारवाई न करण्याचे न्यायालयाचे निर्देश

3. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ठाण्यातील न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट, खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश

4. फोन टॅपिंगचा अहवाल फडणवीसांनी नव्हे तर आव्हाड आणि मलिक यांनी उघड केला, रश्मी शुक्लांचा न्यायालयात दावा, तर सीबीआयकडून अधिकाऱ्यांचं खच्चीकरण, राज्य सरकारचा कोर्टात आरोप 

5. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याच्या मागण्या सरकारकडून मान्य

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 29 ऑक्टोबर 2021 : शुक्रवार : ABP Majha

6. दोन दिवसांपासून बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात आयकरच पथक ठाण मांडून, अशोक चव्हाणांशी संबंधित कारखान्यांना दिलेल्या कर्जाप्रकरणी चौकशी सुरु

7. मुंबईतील कफ परेडच्या झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एक पाऊल पुढे, नौदलाकडून एनओसी घेण्यासाठी विकासकाचे प्रयत्न, 70 हजार झोपडपट्टीवासियांचं जीवन पालटणार असल्याचा दावा

8. मुंबै बँकेची चौकशीविरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळली, प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं

Mumbai Bank News : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेची याचिका फेटाळून लावत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षातील बँकेच्या आर्थिक व्यवहारांच्या अनियमिततेची चौकशी करण्याचा सहकार विभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. चौकशी करण्याच्या या निर्णयाला मुंबै बँकेच्यावतीनं हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्यापुढे यावर सुनावणी झाली असता बँकेची ही याचिका फेटाळून लावण्यात आली. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्वोसर्वा आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

9. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं कॅडेट्स बनले अधिकारी, पुण्यात एनडीएच्या 141व्या तुकडीचं दीक्षांत संचलन, खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन अधिकाऱ्यांची नवी फौज देशसेवेसाठी सज्ज

10. फेसबुक आता मेटा नावानं ओळखलं जाणार, लोगोमध्येही बदल,  रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने मार्क झुकरबर्ग यांची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget