(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 सप्टेंबर 2021 मंगळवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 सप्टेंबर 2021 मंगळवार | ABP Majha
1. मुंबईत काल महिला विशेष लसीकरण सत्रात 1 लाख 26 हजार 419 महिलांना लस, आज विद्यार्थी, शिक्षकांचं लसीकरण होणार
2. हवामान विभागाकडून 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना, नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन
3. प्रलंबित तक्रारी आणि फाईल्सवर कारवाई करण्यासाठी 31 ऑक्टोबरची डेडलाईन, मोदींच्या अनोख्या स्वच्छता अभियानाची प्रशासकीय वर्तुळात चर्चा
4. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, 17 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार
5. आरोग्य विभागाच्या परीक्षांची तारीख जाहीर, 24 ऑक्टोबरला गट क ची तर 31 ऑक्टोबरला गट ड ची परीक्षा, न्यासा कंपनीकडून माफीनामा
6. आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदाही कोरोना सावटात, लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार
7. सचिन वाझेच्या घरीच नजरकैदेत ठेवण्याच्या अर्जाला NIA चा विरोध; घरातून फरार होण्याची भीती व्यक्त
8. अधिकाऱ्यांनी मुक्कामी राहून खराब महामार्गांची 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश
9. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस, गीतकार गुलजार यांचं 26 वर्षापूर्वी रेकॉर्ड केलेलं गाणं आज नव्या अंदाजात सादर होणार
10. जेसन रॉय, विल्यमसन्सच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादची राजस्थानवर सात विकेटने मात, आज मुंबई-पंजाब आमने-सामने